shaili magazine

राज ठाकरे यांची डोळेउघड ट्विटर पोस्ट: वाचा २०२५ चे महत्वाचे मुद्दे

राज ठाकरे यांनी महाराष्ट्र सैनिकांसाठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर भाष्य केले आहे. बदलांची दिशा काय? वाचा सविस्तर.

नवीन वर्षाच्या शुभेच्छांसह राज ठाकरेंनी तुम्हाला सांगितले कि गेल्या २५ वर्षांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून सर्वांनी अनेक चढ-उतार पाहिले आहेत. हा काळ पूर्ण बदलांनी व्यापलेला असूनही काही समस्या आजही कायम आहेत ज्यासाठी त्यांना झटायचे आहे.

महाराष्ट्राच्या राजधानीत मराठी माणसाची असुरक्षितता असे त्यांनी सांगितले. त्यांना अजूनही बेरोजगारीचे संकट डोळ्यासमोर दिसत आहे. त्याचबरोबर महागाईमुळे होरपळणारे जीवन यांसारख्या मुद्द्यांनी आपण सर्वांनी जागरूक राहायला पाहिजेत.

राज ठाकरे यांनी महाराष्ट्र सैनिकांसाठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर भाष्य केले आहे. बदलांची दिशा काय? वाचा सविस्तर.
राज ठाकरे नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर भाष्य केले आहे.

त्यांनी व त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नेहमीच लोकांच्या मनामध्ये एक विश्वास निर्माण केला. मात्र सगळं वाया जातांनी दिसतं. ते म्हणतात कि मतदानाच्या वेळेस सगळे विसरून जातात. ह्या खंतावणाऱ्या सत्यासोबत आपण सर्व जगत आहो. तरीही, आपण या गोष्टी मागे ठेवून नव्या उमेदीने कामाला सुरुवात केली पाहिजे. विधानसभेच्या निकालांनंतर राज ठाकरेंनी काही काळ राजकीय भाषणे टाळली, पण आता विचारमंथनाच्या टप्प्यानंतर लवकरच सविस्तर बोलण्याचा मानस आहे.

राज ठाकरे यांची ट्विटर पोस्ट आपल्यांना जागवून करून जाते, वाचा त्यांची पोस्ट

माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना सस्नेह जय महाराष्ट्र, सर्व प्रथम सर्वांना इंग्रजी नवीन वर्षाच्या शुभेच्छा ! कालगणनेत या वर्षाला एक महत्व आहे , कारण या शतकातील, पाव शतक संपायला आलं. माणसाच्या आयुष्यातल्या जवळपास प्रत्येक क्षेत्रांत इतके प्रचंड बदल झालेत की २५ वर्षांपूर्वीच आयुष्य हे वेगळं युग वाटावं. या २५ वर्षांच्या कालखंडात आपला पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना ज्याची स्थापना झाली, तो स्थिरावला, पक्षाने अनेक चढउतार पाहिले. आणि हे सगळं आपल्या सगळ्यांना खूप काही शिकवून गेलं. या २५ वर्षांत जरी खूप बदल झाला असला तरी अनेक गोष्टी तशाच राहिल्यात, मुंबईसारख्या महानगरात जी महाराष्ट्राची राजधानी आहे, तिथे मराठी माणसाला असुरक्षित वाटणं. तरुण मुलामुलींच्या हाताला काम न मिळणे पण त्याच वेळेस बाहेरच्या राज्यातून येणाऱ्यान नोकरीच्या संधी मिळणं. बेरोजगाराला जात नसते, पण त्याला ती जात जाणवून देऊन, जातीजातीत भांडणं लावणं. शेतकऱ्यापासून ते सर्वच कष्टकऱ्यांच आयुष्य महागाईने होरपळून निघणं. आणि या आणि इतर प्रत्येक समस्येच्या वेळेस लोकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आठवण होणे, पण नेमकं मतदानाच्या वेळेस पक्षाचा विसर पडणे. पण ठीक आहे, हे स्वीकारून आपण आता काही बदलांसकट पुढे जायला हवं. २३ नोव्हेंबर २०२४ रोजी विधानसभेचे निकाल लागल्यानंतर मी काही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झालो, पण मुद्दाम राजकीय भाष्य टाळलं. नक्की काय घडलं यावर माझं मंथन सुरु आहे आणि लवकरच मी या सगळ्यावर सविस्तर बोलेन. पण महाराष्ट्र सैनिकांना माझं आवाहन आहे की जे घडलं ते विसरून जा. निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर पुढे काही आठवड्यातच मराठी माणसांविरोधात दंडेलशाही सुरु झाली, आणि त्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दणका द्यावा अशी अपेक्षा व्यक्त झाली आणि जे आपण केलं देखील. मुळात मराठी माणूस हा फक्त मतदानासाठी वापरला जातोय हे वास्तव अधोरेखित झालं. त्यात महिलांविरोधात अत्याचार वाढतच आहेत. राज्यातले दोन समाज जे दोन्ही मराठी भाषिक, पण त्यांच्यात संघर्ष पेटला आहे. आणि महागाईने लोकं होरपळली आहेत. असं असताना महाराष्ट्र सैनिकांनी स्वतःच्या मनातील खंत आता बाजूला ठेवली पाहिजे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपण काहीच करत नाही, त्यामुळे या सगळ्यात आता कृती करण्याची जबाबदारी आपलीच आहे. मी मागे म्हणलं तसं मराठीवर कोणी हल्ला केला तर मराठी म्हणून आणि हिंदू माणसाच्या गळ्याला नख लावलं तर हिंदू म्हणून मी अंगावर येईन, ते आपण करत आहोतच. पण राज्यात महिलांच्यावर जे अत्याचार होत आहेत, त्याच्यासाठी एक संपर्क कक्ष पक्षाच्या कार्यालयात सुरु करा. महिलांच्या तक्रारी नोंदवून घेतल्या जात नसतील तर त्याचा पाठपुरावा करा. आणि तरीही काही घडलं नाही तर हात मोकळे सोडून अत्याचार करणाऱ्या त्या नराधमाना चांगलं फोडून काढा. महागाईने होरपळलेल्याना दिलासा द्यायला हवा, यासाठी साठेबाजी होत नाहीये ना, हे पाहून त्याची सूचना संबंधित खात्याना करा आणि त्याच्या जोडीला शेतकरी आणि ग्राहक यांच्यातील दुवा बनण्याचा प्रयत्न करा. थोडक्यात आपल्या शाखा, कार्यालयं पुन्हा एकदा लोकांसाठी खुली करा. आणि हो, हे सगळं करताना सोशल मीडिया आपल्या कामाच्या प्रचार प्रसारासाठी वापरायचा आहे पण सोशल मीडिया तुम्हाला वापरत नाहीये ना, त्याच्या अधीन जात नाही आहोत ना हे पहा. लवकरच मी सविस्तर बोलेन, त्यात अधिक व्यापक दिशा तुम्हाला देईनच. तोपर्यंत नवीन वर्षासाठी आणि पुन्हा नव्याने कामाला सुरुवात करण्यासाठी शुभेच्छा !

राज ठाकरे ।

असे म्हणत त्यांनी नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र सैनिकांना नव्या ऊर्जेने कामाला लागण्याचे आवाहन केले आहे.

राज ठाकरे यांच्या या संदेशात महाराष्ट्र सैनिकांसाठी विचार करण्यासारखे मुद्दे आहेत. पक्षाची दिशा बदलांसह ठरवताना राज ठाकरे यांचा हा मार्गदर्शक संदेश प्रेरणादायी ठरेल.

नरेंद्र मोदींचं पत्र आणि हिरवाईची सेना (Green Army) निर्मला देवी, काय आहे हि ग्रीन आर्मी?

Green Army: भारताची ग्रीन आर्मी काय आहे, त्यांचा काय कार्य आहे जाणून घ्या सविस्तर. बराच गावातली त्यांनी नसा मुक्ती व...
Green Army: भारताची ग्रीन आर्मी काय आहे, त्यांचा काय कार्य आहे जाणून घ्या सविस्तर. बराच गावातली त्यांनी नसा मुक्ती व...
भारताची ग्रीन आर्मी

ग्रीन आर्मी हे एक बायकांची सेने आहे ज्यांनी गावातील नाश जसेकी दारू, जुवा आणि बर्याच वाईट सवयी गावातून पूर्णपणे नाहीशी केली. त्यांच्या गटात तीस पेक्षा जास्त बाया आहे ज्यांनी हे सर्व घडवून आणल. हे सर्व बघून भारताचे पंतप्रधान यांनी ग्रीन आर्मीला एक पत्र लिहिले. हे पत्र वाचून ग्रीन आर्मी खूप खुश झाली.

वारणासीजवळील देवरा या छोट्याशा खेड्यात राहणारी निर्मला देवी विचार करत होती, “तो हे घालेल, तर साऱ्या जगाला कळेल!” ‘हिरवाईची सेना’ या महिलांच्या संघटनेची स्थापना आत्मनिर्भरतेसाठी झाली होती. त्यांनी चप्पल तयार करणाऱ्या कारखान्याची सुरुवात केली. परंतु त्यांनी बनवलेला पहिला जोडा विक्रीसाठी नव्हता, तो एका खास व्यक्तीसाठी होता.

निर्मला देवीची हि ग्रीन आर्मी

मनात आशा आणि विश्वास घेऊन त्यांनी तो जोडा पाठवला. “जर त्यांनी तो घातला, तर आपली कहाणी जगाला कळेल आणि स्वप्न साकारतील,” असे त्या महिलांना वाटत होते. काही दिवसांनी एक पत्र आलं. निर्मला देवीने ते हातात घेतलं आणि आनंदाश्रूंनी तिचे डोळे चमकले. “हे पत्र वाचताना वाटलं, जणू नरेंद्र मोदी स्वतः इथे आले आहेत!” ती भावूक झाली. हे पत्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं होतं. त्यांनी ‘हिरवाईची सेना’च्या बहिणींच्या उपक्रमाचे मनापासून कौतुक केलं होतं.

वाचा नरेंद्र मोदीजीनी Green Army साठी काय लिहिले: “तुमच्या चप्पल कारखान्याबद्दल ऐकून मला आनंद झाला. तुमचं ठाउत्फुल भेटवस्तू सादर करणं खूप प्रेरणादायक आहे. देश आणि समाजाच्या प्रगतीसाठी तुमचं योगदान अभिमानास्पद आहे,” असे त्या पत्रात लिहिले होते.

‘हिरवाईची सेना’साठी हा गौरवाचा क्षण होता. त्यांच्या मेहनतीला मिळालेलं हे मान्यत्व आणि प्रोत्साहन, त्यांची स्वप्नं सत्यात आणण्यासाठी ऊर्जा देणारं ठरलं. या महिलांनी आधीच गावात नशाबंदी आणि जुगारविरोधी जनजागृती केली होती, मुलीच्या जन्माचा उत्सव साजरा करण्याची परंपरा सुरू केली होती आणि हुंडाविरोधी लढा दिला होता. त्यांचे कार्य आता देशाच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचले होते.

“चौपट आनंद वाढला!” निर्मला देवी म्हणाली, या अभिमान आणि आनंदाच्या क्षणाला शब्द देत. ‘हिरवाईची सेना’साठी ही केवळ सुरुवात होती.

हिरवाईची सेना: महिलांच्या सामर्थ्याची प्रेरणा त्यांनी जे केले ते केवळ गावासाठी नव्हे, तर संपूर्ण देशासाठी एक आदर्श घालून दिला. त्यांचा आत्मविश्वास आणि मेहनत सर्वांना प्रेरणा देणारी आहे. निर्मला देवी आणि ‘हिरवाईची सेना’चा प्रेरणादायी प्रवास, पंतप्रधान मोदींचं कौतुक, आणि त्यांच्या कामगिरीचं देशभर कौतुक.

ओसामु सुझुकी: १९८३ साली भारतात पैसे गुंतवण्याची प्रेरणादायक कहाणी

ओसामु सुझुकी यांनी १९८३ साली भारतात पैसे का गुंतवले? त्यांचा प्रेरणादायक प्रवास जाणून घ्या, ज्यामुळे मारुती ८०० भारतात घराघरात पोहोचली.
ओसामु सुझुकी यांनी १९८३ साली भारतात पैसे का गुंतवले? त्यांचा प्रेरणादायक प्रवास जाणून घ्या, ज्यामुळे मारुती ८०० भारतात घराघरात पोहोचली.
ओसामु सुझुकी यांनी १९८३

ओसामु सुझुकी कोण होते, आणि त्यांनी १९८३ साली भारतात पैसे का गुंतवले? हा प्रश्न विचारल्यावर आपल्याला एका असामान्य व्यक्तीची कथा समजते. ओसामु सुझुकी हे जपानच्या सुझुकी मोटर कंपनीचे प्रमुख होते. त्यांनी भारतात १९८२ मध्ये मारुती उद्योग लिमिटेड स्थापन करून, भारतीय ऑटोमोबाईल उद्योगाला एका वेगळ्या उंचीवर नेले. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतात सर्वांगीण लोकप्रिय ठरलेल्या मारुती ८०० ने लाखो कुटुंबांचे स्वप्न साकार केले.

ओसामु सुझुकी कुठे जन्मले व त्यांची सुरुवात कार बिसिनेस मध्ये कशी झाली?

PM meeting the Adviser, Suzuki Motor Corporation, Mr. Osamu Suzuki, in Japan on May 23, 2022.
PM meeting the Adviser, Suzuki Motor Corporation, Mr. Osamu Suzuki, in Japan on May 23, 2022.

ओसामु सुझुकी यांचा जन्म ३० जानेवारी १९३० रोजी जपानच्या गेरो गावात झाला. शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी लोण ऑफिसर म्हणून करिअरची सुरुवात केली. पुढे सुझुकी कुटुंबाने त्यांना दत्तक घेतले, ज्यामुळे त्यांच्या आयुष्यात मोठा बदल झाला. त्यांनी सुझुकी कंपनीत साध्या पदावर काम करत सुरुवात केली, पण त्यांच्या मेहनतीमुळे ते डायरेक्टरच्या स्थानापर्यंत पोहोचले.

१९७० च्या दशकात ओसामु यांनी जागतिक बाजारपेठेचा अभ्यास करण्यासाठी अनेक देशांचा प्रवास केला. भारतात गरीबी आणि मर्यादित संसाधनांच्या काळातही त्यांना भारताच्या प्रचंड संभावनेचा अंदाज आला. त्यानंतर, १९८२ मध्ये त्यांनी भारत सरकारसोबत भागीदारी केली आणि मारुती उद्योगाची सुरुवात केली.

मारुती ८०० ने भारतात ऑटोमोबाईल क्षेत्रात क्रांती केली. स्वस्त, टिकाऊ, आणि कमी खर्चिक ही कार सामान्य कुटुंबांसाठी वरदान ठरली. भारतीय बाजारात यशस्वी झाल्यामुळे ओसामु यांना मोठा फायदा झाला. त्यांच्या या उपक्रमामुळे अनेकांना रोजगार मिळाला आणि देशाच्या आर्थिक वाढीत हातभार लागला.

१९८० ते २००० च्या दरम्यान, सुझुकी मोटर्सने जगभरात आपली ओळख निर्माण केली. ६० प्लांट्स आणि ३१ देशांमध्ये व्यवसाय विस्तारल्यामुळे ही कंपनी जागतिक स्तरावर प्रसिद्ध झाली. ओसामु यांनी आपल्या नेतृत्वाखाली २००३ पर्यंत वार्षिक उत्पन्न १६ बिलिओन डॉलर्सपर्यंत नेले.

२००४ साली जपानमध्ये त्यांच्या यशाची दखल घेण्यात आली आणि सुझुकी कंपनीला देशातील नंबर १ कार निर्मातीचा दर्जा मिळाला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत २०१४ मध्ये झालेल्या चर्चेत त्यांनी भारतीय उद्योगाला प्रोत्साहन दिले.

२५ डिसेंबर २०२४ रोजी ओसामु सुझुकी यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या कर्तृत्वामुळे भारतीय उद्योगक्षेत्रात नवा इतिहास निर्माण झाला. त्यांनी घेतलेले निर्णय आणि दाखवलेला धाडस भारतासाठी नेहमीच प्रेरणादायी राहतील.

ओसामु सुझुकी यांची प्रेरणा कायम राहील

ओसामु सुझुकी यांची कथा केवळ यशाची नाही, तर धाडस, मेहनत, आणि दूरदृष्टीची आहे. त्यांनी घेतलेल्या निर्णयांनी भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्राला नवसंजीवनी दिली. त्यांच्या आठवणींमुळे अनेकांना पुढे जाण्यासाठी प्रेरणा मिळत राहील.

भारताचे कृषी क्रांतीचे जनक: डॉ. पंजाबराव देशमुख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले अभिवादन

भारताचे पहिले कृषिमंत्री आणि शिक्षण क्षेत्रातील दिग्गज, डॉ. पंजाबराव देशमुख यांचे जीवन आणि कार्य. त्यांच्या योगदानामुळे भारतीय कृषी आणि शिक्षण क्षेत्रात झालेले बदल जाणून घ्या.
भारताचे पहिले कृषिमंत्री आणि शिक्षण क्षेत्रातील दिग्गज, डॉ. पंजाबराव देशमुख यांचे जीवन आणि कार्य. त्यांच्या योगदानामुळे भारतीय कृषी आणि शिक्षण क्षेत्रात झालेले बदल जाणून घ्या.
भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख

आज आपण भारताच्या कृषी क्षेत्रातील एका महान व्यक्तीमत्त्वाची, डॉ. पंजाबराव देशमुख यांची जयंती साजरी करत आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. पण खरं तर पंजाबराव देशमुख कोण होते? त्यांच्या जीवनात काय काय विशेष घडले? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपण आजच्या लेखात एक प्रवास करणार आहोत.

भारताचे पहिले कृषिमंत्री, शिक्षणमहर्षी डॉ. भाऊसाहेब ऊर्फ पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिवादन केले.

विदर्भाचा अभिमान: पंजाबराव देशमुखांची अमरगाथा

आज त्यांचा जन्म दिवस आहे आणि मला त्यांच्या कर्तृत्वाबद्दल थोडासा लिहावंसं वाटलं. त्यांचा शिक्षणामध्ये वाटा तर बराच आहे परंतु शेती व शेतकरांसाठी बराच फायद्याचा ठरला.

विदर्भात जन्मलेले पंजाबराव देशमुख हे केवळ राजकारणीच नव्हते तर एक शिक्षणतज्ज्ञ, लेखक आणि समाजसुधारकही होते. त्यांच्या अनेक विद्यालये आहेत आणि त्यातली एक म्हणजे आंजी या गावी असलेली “आदरश्या विद्यालय” या शाळेचा मी विध्यार्थी. त्यांनी शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले. स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री म्हणून त्यांनी भारतीय कृषी क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून आणले. त्यांच्या विद्यालयात शिकणे म्हणजे एका झिल्ला परिषद च्या शाळेत शिकल्यासारखं स्वस्त व उत्तम शिक्षण ह्याची तर खात्री आहे.

शेतकऱ्यांचे मसीहा: डॉ. पंजाबराव देशमुख

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न, कृषी शिक्षणावर त्यांचा जोर आणि विदर्भात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी स्थापन केलेली श्री शिवाजी शिक्षण संस्था यांचे उदाहरण देऊन आपण त्यांच्या कार्याची महती लक्षात आणू शकतो.

पंजाबराव देशमुख हे केवळ एक राजकीय नेते नव्हते तर ते एक विचारवंत, लेखक आणि समाजसुधारक होते. त्यांच्या लेखनातून त्यांचे दूरदृष्टीचे दर्शन घडते. त्यांनी शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी केलेले प्रयत्न, कृषी शिक्षणावर त्यांचा जोर आणि विदर्भात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी स्थापन केलेली श्री शिवाजी शिक्षण संस्था यांचे उदाहरण देऊन आपण त्यांच्या कार्याची महती लक्षात आणू शकतो.

पंजाबराव देशमुखांचे जीवन आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्यातून आपल्याला शिकायला मिळते की, समाजसेवा ही केवळ राजकारण्यांचीच जबाबदारी नाही तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. आपणही आपल्या क्षमतेनुसार समाजाच्या हितासाठी काम करू शकतो.

डॉ. पंजाबराव देशमुख हे भारताच्या इतिहासात अमरत्व प्राप्त झालेले एक नामदार व्यक्तिमत्व होते. त्यांच्या कार्याने लाखो शेतकऱ्यांचे जीवन बदलले. त्यांच्या विचारांचा आजही आपल्याला मार्गदर्शन होतो. त्यांना विसरून जाणे म्हणजे आपल्याच इतिहासाची उपेक्षा करणे होय.

आजच्या या लेखातून आपण पंजाबराव देशमुख यांच्या जीवनाबद्दल थोडेसे जाणून घेतले. त्यांच्या विचारांचा आपल्या जीवनात अवलंब करून आपणही समाजाच्या हितासाठी काम करू शकतो.

ज्येष्ठ साहित्यिक सुप्रिया अय्यर यांचे निधन

नागपूरच्या ज्येष्ठ साहित्यिक सुप्रिया अय्यर यांचे निधन; त्यांच्या साहित्यिक योगदानाची व सामाजिक कार्याची आठवण राहील.

नागपूर: ज्येष्ठ साहित्यिक, कथाकार आणि कादंबरीकार सुप्रिया अय्यर यांचे सोमवारी रात्री ८ वाजता निधन झाले. त्या ७४ वर्षांच्या होत्या आणि कर्करोगाशी झुंज देत होत्या. त्यांच्या निधनाने साहित्यिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या अंत्ययात्रेचे नियोजन शंकरनगर येथील निवासस्थानातून करण्यात आले असून, अंत्यसंस्कार अंबाझरी घाटावर होणार आहेत.

अय्यर यांचा जन्म नागपूरमध्ये झाला होता आणि त्यांनी साहित्य क्षेत्रात लहान वयापासूनच योगदान देणे सुरू केले. त्यांनी अभिव्यक्ती संस्थेचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर संस्थेला एक वेगळेच स्थान मिळवून दिले. त्यांनी २०२२ मध्ये नागपूर साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन केले होते, ज्यामुळे नागपूरचे साहित्यिक महत्त्व वाढले.

सुप्रिया अय्यर: साहित्यिक विश्वातील एक तेजस्वी नक्षत्र

नागपूरच्या ज्येष्ठ साहित्यिक सुप्रिया अय्यर यांचे निधन; त्यांच्या साहित्यिक योगदानाची व सामाजिक कार्याची आठवण राहील.
नागपूरच्या ज्येष्ठ साहित्यिक सुप्रिया अय्यर यांचे निधन.

त्यांच्या प्रकाशित कादंबऱ्या ‘शुद्ध वेदनांची गाणी,’ ‘कन्याकोलम,’ आणि ‘अजन्मा’ या वाचकांमध्ये लोकप्रिय ठरल्या. याशिवाय, वऱ्हाडी भाषेतील त्यांच्या कथांना विशेष पसंती मिळाली. ‘खुळी बोगनवेल,’ ‘सोन्याचे दरवाजे,’ आणि ‘किनखापी मोर’ हे त्यांच्या उत्कृष्ट कथासंग्रहांपैकी काही आहेत.

विदर्भ साहित्य संघाकडून त्यांच्या दोन कथासंग्रहांना पुरस्कार मिळाले आहेत. यामुळे त्यांच्या साहित्यकौशल्याची दखल घेतली गेली. साहित्याबरोबरच त्यांनी आकाशवाणीवर श्रुतिका, कथा आणि लेखांचे लेखनही केले, ज्यामुळे त्यांच्या आवाजातील ताकदही समोर आली.

सामाजिक कार्यात त्यांचा हातखंडा होता. त्यांनी मेडिको सोशल वर्कर म्हणून राज्य शासनाच्या एड्स नियंत्रण सोसायटीवर काम केले. त्यांनी एड्स आणि आरोग्यविषयक जनजागृतीसाठी मोठे योगदान दिले आहे. साहित्य आणि संस्कृती क्षेत्रात त्यांनी असंख्य जबाबदाऱ्या सांभाळल्या. त्या राज्य शासनाच्या वाङ्मय पुरस्कार समितीच्या आणि साहित्य व संस्कृती मंडळाच्या माजी सदस्या होत्या. त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील.

अय्यर यांच्या कुटुंबामध्ये दोन मुले, सुना, आणि नातवंडे असा आप्तपरिवार आहे. त्यांच्या जाण्याने कुटुंबीय आणि साहित्यिक मंडळ दु:खी आहे. त्यांच्या साहित्यकृती आणि सामाजिक कार्यामुळे त्या आजही प्रेरणादायक ठरतात. सुप्रिया अय्यर यांचे साहित्य आणि जीवनातील योगदान नेहमीच प्रेरणा देणारे राहील. त्यांच्या स्मृतींना साहित्य क्षेत्रातील मानाचा मुजरा! सुप्रिया अय्यर यांच्या निधनाने साहित्यविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या शब्दांनी आणि कार्यांनी उभे केलेले साहित्यिक वास्तव्य कायम प्रेरणादायी राहील.

वास्तववादी चित्रपट निर्मितीचे पितामह श्याम बेनेगल यांना आदरांजली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्याम बेनेगल यांना श्रद्धांजली अर्पण केली, भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अमूल्य योगदानाचा गौरव.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्याम बेनेगल यांना श्रद्धांजली अर्पण केली, भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अमूल्य योगदानाचा गौरव.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्याम बेनेगल यांना श्रद्धांजली

मुंबई, दि. २३: भारतीय चित्रपट सृष्टीत वास्तववादी निर्मितीचे पायाभूत कार्य करणारे ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवे तर अनेक सिनेमा जगतांनी आदरांजली अर्पण केली आहे. आपल्या शोकसंदेशात फडणवीस, मोठमोठ्या कलाकारांनी तसेच राजकारणिलोकांनी बेनेगल यांचे भारतीय चित्रपटसृष्टीत केलेले योगदान अजरामर राहील, असे मत व्यक्त केले.

कलाकार रणदीप हुडा म्हणाले: तो #श्यामबेनेगल कदाचित निघून गेला असेल पण तो त्याच्या अविस्मरणीय चित्रपटांद्वारे जगेल.. त्याने त्याच्या सिनेमाद्वारे माझ्यासह अनेक जीवनांना प्रेरणा दिली.. दुर्दैवाने त्याच्यासोबत दोन वेळा काम करणे चुकले.. नेहमी दयाळू, मृदू बोलणारा आणि विचारशील.. तो त्यांना जे आवडते ते शेवटपर्यंत करत राहिलो, आम्हाला पुन्हा प्रेरणा देत राहिलो.. धन्यवाद बेनेगल साब.

वास्तववादी चित्रपट निर्मितीचे पितामह: श्रद्धांजली श्याम बेनेगल यांना

श्याम बेनेगल यांनी चित्रपट माध्यमाच्या सामर्थ्याला ओळखून भारतीय चित्रपटांना नवा आयाम दिला. त्यांच्या वास्तववादी चित्रपट निर्मितीने केवळ राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारतीय चित्रपटसृष्टीला ओळख मिळवून दिली. कर्नाटकातील कोकणी कुटुंबातून आलेल्या बेनेगल यांनी वयाच्या बाराव्या वर्षी चित्रपट निर्मितीला सुरुवात केली होती. वडिलांनी भेट दिलेला कॅमेरा त्यांच्या जीवनाचा आधारस्तंभ ठरला.

“अंकुर,” “मंथन,” “मंडी,” आणि “जुनून” या त्यांच्या चित्रपटांनी समांतर चित्रपट चळवळीला भक्कम पाया दिला. त्यांच्या चित्रपटांमधून सर्वसामान्यांच्या आयुष्याचा वेध घेतला गेला, ज्यामुळे ते चित्रपट सृष्टीतील नव्या युगाचे जनक ठरले. जाहिरातपट व माहितीपट निर्मितीतही त्यांनी आपली अमिट छाप सोडली.

बेनेगल यांची दिग्दर्शनशैली सहज आणि तरीही प्रखर होती. त्यांनी चित्रपट सृष्टीत अनेक नवे कलाकार तयार केले आणि त्यांना घडवले. त्यांच्या चित्रपटांमधून पात्रांच्या जगण्याचे वास्तव जिवंत झाले. त्यांच्या शैलीचा अभ्यास आजही अनेक चित्रपट प्रेमी व अभ्यासक करत आहेत. समांतर चित्रपटांची चळवळ अधिक बळकट करण्यासाठी त्यांनी आपला मोठा वाटा उचलला. त्यांच्या कलाकृतींनी भारतीय चित्रपटांना आधुनिकतेकडे नेले. त्यांच्या चित्रपटांमधील सादरीकरण नेहमीच वैशिष्ट्यपूर्ण राहिले.

श्याम बेनेगल यांच्या निधनाने चित्रपट सृष्टीला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या जाण्याने एक मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. ही हानी कधीही भरून येणार नाही. त्यांच्या चित्रपट निर्मितीच्या शैलीचा भारतीय चित्रपटसृष्टीत कायम आदर केला जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. त्यांच्या आत्म्यास ईश्वरचरणी सद्गती लाभो आणि त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, अशी प्रार्थना त्यांनी केली.

भारतीय चित्रपटसृष्टीत समांतर चित्रपट निर्मितीचे पर्व आणणाऱ्या श्याम बेनेगल यांचे योगदान अजरामर राहील. त्यांच्या कलाकृती सृष्टीला प्रेरणा देत राहतील.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अहिल्यानगर येथे स्वागत, अण्णा हजारेंहि यांची पण दिल्या शुभेच्छा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अहिल्यानगर येथे आगमन. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनच्या हेलिपॅडवर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अहिल्यानगर येथे आगमन. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनच्या हेलिपॅडवर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करत त्यांना राळेगणसिद्धी येथे येण्याचे आमंत्रण दिले. यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी श्री. हजारे यांना नमस्कार करत अभिनंदनाबद्दल त्यांचे आभार मानले.

अहिल्यानगर, दि. २२: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या हेलिपॅडवर आगमन झाले. या प्रसंगी विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांची उपस्थिती होती. मुख्यमंत्री फडणवीस यांचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विशेष सत्कार केला.

अहिल्यानगरमधील मुख्यमंत्र्यांचे आगमन

मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे देखील उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी अण्णा हजारे यांचे अभिनंदन करत त्यांना चांगल्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. समाजसेवेसाठी अण्णा हजारे यांनी दिलेले योगदान मुख्यमंत्र्यांनी कौतुकाने मान्य केले.

यावेळी प्रमुख नेते आणि प्रशासनातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार संग्राम जगताप, शिवाजीराव कर्डिले, काशिनाथ दाते, माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी या कार्यक्रमात भाग घेतला. विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची उपस्थिती लक्षणीय ठरली.

या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर आणि महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांची उपस्थितीदेखील होती. या नेत्यांच्या उपस्थितीने कार्यक्रम अधिक भव्य झाला.

मुख्यमंत्र्यांचे शिर्डी विमानतळ येथे आगमन झाल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांच्यासह अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला. शिर्डीतील विमानतळावर मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले आणि तेथून अहिल्यानगरकडे त्यांचा प्रवास सुरु झाला.

कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना संबोधित केले आणि विविध योजनांवर भर दिला. त्यांनी राज्यातील पायाभूत सुविधा आणि विकासकामांसाठी आपली वचनबद्धता व्यक्त केली.

अहिल्यानगरातील हा स्वागत समारंभ उर्जित आणि उत्साहवर्धक वातावरणात पार पडला. जनतेच्या अपेक्षा आणि स्थानिक प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेण्यात आला.

मुख्यमंत्र्यांच्या या भेटीने अहिल्यानगरात विकासकामांसाठी नव्या संधींचा मार्ग मोकळा होईल, अशी स्थानिकांची अपेक्षा आहे. कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांशी संवाद साधला आणि स्थानिक समस्यांवर चर्चा केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अहिल्यानगरातील आगमन विकासाच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. त्यांच्या या भेटीने स्थानिकांना नव्या आशा निर्माण झाल्या आहेत.

कल्याण प्रकरण: राज्य शासनाची ठाम भूमिका

कल्याण येथील सोसायटीतील मराठी कुटुंबावर झालेल्या हल्ल्यांवर राज्य शासनाने तातडीने कारवाई केली आहे. दोषींवर गुन्हा नोंदवून त्यांच्यावर कठोर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
कल्याण येथील सोसायटीतील मराठी कुटुंबावर झालेल्या हल्ल्यांवर राज्य शासनाने तातडीने कारवाई केली आहे. दोषींवर गुन्हा नोंदवून त्यांच्यावर कठोर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
कल्याण प्रकरण: राज्य शासनाची ठाम भूमिका | Pic: Twitter

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण प्रकरणात मराठी माणसांवरील अन्यायाविरोधात कठोर पावले उचलण्याचे विधान केले आहे. फडणवीस यांनी विधानपरिषदेत या प्रकरणावर उत्तर देताना सांगितले की, महाराष्ट्र आणि मुंबई ही मराठी माणसांची आहे आणि त्यांच्यावर अन्याय होऊ दिला जाणार नाही. विधानपरिषद सदस्य ऍड. अनिल परब यांनी या विषयावर विधानपरिषद नियम 289 अंतर्गत चर्चा मांडली. या चर्चेत सदस्य ऍड. परब, शशिकांत शिंदे, अरुण भाई जगताप, सचिन अहिर यांनी सहभाग घेतला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या चर्चेला उत्तर देताना दोषींवर कारवाई करण्याचे स्पष्ट आश्वासन दिले.

कल्याण प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीस यांचे ठाम विधान

मुख्यमंत्र्यांनी कल्याणमधील घटनेची माहिती देताना सांगितले की, अखिलेश शुक्ला आणि त्याच्या पत्नीने एका भांडणात मराठी माणसाचा अपमान केला. खडकपाडा पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा नोंदविण्यात आला असून, शुक्ला हा एमटीडीसीचा कर्मचारी असल्याने त्याला निलंबित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मुंबईसारख्या शहरात, जेथे देशभरातील लोक शांततेने राहतात, अशा काही घटनांमुळे सामाजिक सलोखा बाधित होतो. उत्तर प्रदेशातून आलेल्या अनेक लोकांनी मराठी भाषेला आपलेसे केले आहे. ते मराठी सण साजरे करतात, मात्र काही अपवादात्मक घटनांमुळे हे वातावरण गढूळ होते, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. वाचा: मराठी माणसाचा आवाज! राज ठाकरे यांचा कल्याण घटनेवर गंभीर आरोप

संविधानाने प्रत्येकाला काय खायचे याचे स्वातंत्र्य दिले आहे, परंतु कोणालाही दुसऱ्याला रोखण्याचा अधिकार नाही. यासंदर्भात तक्रारी आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी ठामपणे सांगितले. देशातील वैविध्य जपण्याची आपली जबाबदारी आहे. मराठी अस्मिता ही महाराष्ट्राचे प्रतीक असून त्यावर कोणताही आघात सहन केला जाणार नाही. मराठी माणसावर अन्याय करणाऱ्यांविरोधात शासन योग्य ती पावले उचलणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांनी मराठी अस्मितेचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, महाराष्ट्राच्या भूमीवर कुणीही भेदभाव सहन केला जाणार नाही. क्षेत्रीय सलोख्यासाठी मराठी भाषा आणि संस्कृतीला आदर देणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. कल्याण येथील घटनेने निर्माण झालेला रोष पाहता, सरकारने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. मराठी माणसांच्या स्वाभिमानाशी छेडछाड करणाऱ्यांना शासनाने इशारा दिला आहे की, यापुढे अशा घटनांना थारा दिला जाणार नाही.

महाराष्ट्रातील मराठी माणूस हा नेहमीच सामाजिक एकात्मतेचा पाठीराखा राहिला आहे. त्यामुळे मराठी अस्मितेच्या विरोधात उभ्या राहणाऱ्या घटकांना रोखण्यासाठी कठोर पावले उचलली जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

कल्याण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हे विधान राज्यातील मराठी माणसांच्या हक्कांसाठी शासन कटिबद्ध असल्याचे दर्शवते. मराठी माणसांच्या हक्कांची जबाबदारी शासनावर आहे आणि कल्याण प्रकरणाच्या निमित्ताने राज्य शासनाने हा विश्वास पुन्हा जिंकला आहे.

मराठी माणसाचा आवाज! राज ठाकरे यांचा कल्याण घटनेवर गंभीर आरोप

राज ठाकरे यांनी कल्याणमधील अत्याचारांवरून सरकार आणि राजकीय पक्षांवर जोरदार टीका केली आहे. मराठी माणसाच्या हक्कांसाठी त्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद द्या.
राज ठाकरे यांनी कल्याणमधील अत्याचारांवरून सरकार आणि राजकीय पक्षांवर जोरदार टीका केली आहे. मराठी माणसाच्या हक्कांसाठी त्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद द्या.
राज ठाकरे यांनी कल्याणमधील अत्याचारांवरून सरकार आणि राजकीय पक्षांवर जोरदार टीका

कल्याणमधील घटना केवळ एक घटना नाही, ती मराठी माणसाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभारणारी घटना आहे. राज ठाकरे यांनी या घटनेच्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या राजकारणातील गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. मराठी माणसाला न्याय मिळाला पाहिजे, यासाठी आपल्या सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे.

महाराष्ट्रात मराठी माणसाची सुरक्षा धोक्यात? राज ठाकरे यांचा सवाल. हे वाचा त्यांनी काय लिहिले त्यांच्या सोसिअल मीडियावर

सस्नेह जय महाराष्ट्र,

कल्याणमध्ये एका मुजोर अमराठी माणसाने मराठी माणसाला, मराठीपणावरून अर्वाच्य शिव्या देत, जबर मारहाण केली. अशीच मुजोरी काही दिवसांपूर्वी गिरगावमध्ये एका अमराठी माणसाने दाखवली. तिकडे त्याला महाराष्ट्र सैनिकांनी जागच्या जागी प्रसाद दिला. कालच्या प्रकरणानंतर पण माझे महाराष्ट्र सैनिक कल्याणमध्ये प्रसाद द्यायला गेले होते. कल्याणच्या घटनेत कोणीतरी शुक्ला नावाचा माणूस होता, महाराष्ट्रात असे अनेक महाराष्ट्रद्वेषी शुक्ला , गुप्तपणे राहत आहेत. मध्यंतरी गिरगावमध्ये घडलेली घटना असो की ही कल्याणमधली, प्रत्येकवेळेला हे असले महाराष्ट्रद्वेषी मराठी माणसाचा कणा तपासून बघत असतात आणि अजून किती तुम्हाला वाकवता येईल हे बघत असतात. बरं असं पण नाही की महाराष्ट्रा बाहेरून इथे आलेले सगळेच महाराष्ट्रद्वेषी आहेत. आज कित्येक पिढ्या इथल्या मातीत मिसळून राहिलेले असंख्य अमराठी माणसं आहेतच.

पण ही जी महाराष्ट्रद्वेषींची नवीन पिलावळ इथे गेले काही वर्ष वळवळायाला लागली आहे, ज्यांचा डोळा इथल्या जमिनीवर आहे, त्यांना वेळीच ठेचलं पाहिजे. मराठी माणसा आता तरी जागा हो, अन्यथा हे तुमच्या पायाखालची जमीन कधी खेचतील आणि कधी तुम्ही नेस्तनाबूत व्हाल हे समजणार पण नाही ! कल्याणमध्ये जे घडलं त्यावर तिथले खासदार, आमदार हे व्यक्त होत नाहीत किंवा मारहाण करणाऱ्यावर गुन्हा दाखल करा म्हणून पाठपुरावा करत नाहीत, हे का घडतं ? कारण याच नाही एकूणच सर्व आमदार खासदारांनी मराठी जनतेला पुरतं ओळखलं आहे. यांना थोडीफार आमिषं दाखवा की हे करतात मतदान आम्हाला ! मी गेली अनेक वर्ष जे नेहमी तुम्हाला सांगतोय की या सर्वांनी तुम्हाला गृहीत धरलं आहे. आणि अशी घटना घडली की सर्वांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दरवाजे ठोठवावेसे वाटतात, कारण तेंव्हा खात्री असते की इतर पक्ष तुमच्या मदतीला धावून येणार नाहीत.

मात्र मतदानाच्या वेळेला मात्र हाच मराठी माणूस इतर पक्षांच्या दरवाजावर जाऊन टकटक करतो ! अर्थात आमच्यासाठी मराठी माणूस हा सगळ्यात महत्वाचा आहे, त्यामुळे आम्ही काहीही झालं तरी धावून जाणारच ! ‘लाडकी बहीण’च्या नावाखाली मतं मागणाऱ्यांना माझा प्रश्न आहे की, ज्यांना मारहाण झाली त्या व्यक्तीची बायको, आई, बहीण ही तुमची लाडकी बहीण नाही का ? मंत्रिपदं महाराष्ट्राची उपभोगणार परंतू त्याच भूमिपुत्राला तुमचा आधार नसणार ! तुम्हाला तुमचा मराठी बांधव सोडून हे असले मुजोर जास्त जवळचे का वाटतात ? तुमची ही लाचारी कशातून येते ते मला माहित नाही आणि तुमची लाचारी तुम्हाला लखलाभ…. हिंदू म्हणून आज आपण एकत्र आलं पाहिजे हे ठीक आहे, पण हिंदू म्हणून एकत्र येताना, प्रत्येक राज्यात तिथली भाषा, तिथली स्थानिक माणसं , तिथली संस्कृती यांना चिरडण्याचा प्रयत्न होता कामा नये. हिंदूत्व आम्ही देखील पुजतो परंतू हिंदूना एकत्र आणायच्या नावाखाली मराठी माणसाच्या किंवा इतर राज्यातील कुठच्याही स्थानिक माणसाच्या गळ्याला नख लगणार नाही हे देखील आपण पाहिले पाहिजे !

मी स्पष्ट सांगतो की या कल्याण प्रकरणात आरोपीना अटक करा, त्यांना कायद्याचा धाक काय असतो ते एकदा दाखवा. आणि जर सरकारला जमत नसेल, तर मग महाराष्ट्र सैनिकांनी थैमान घातलं तर आमच्याकडे बोट दाखवू नका. मी नेहमी म्हणतो की पोलिसांवर माझा विश्वास आहे, त्यांनी या विश्वासाला सार्थ ठरावं. बाकी सरकारने पण हे असले प्रकार परत होणार नाहीत यासाठी ठोस कारवाई करावी. राज ठाकरे ।

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ मराठी अर्थ

vakratunda mahakaya in marathi: गणेश मंत्र "वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥" चंतन्याचे महत्व, फायदे आणि शास्त्रीय कारणांबद्दल जाणून घ्या.
vakratunda mahakaya in marathi: गणेश मंत्र "वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥" चंतन्याचे महत्व, फायदे आणि शास्त्रीय कारणांबद्दल जाणून घ्या.
गणेश मंत्र महत्व, फायदे आणि शास्त्रीय कारणांबद्दल जाणून घ्या. [Vakratunda mahakaya in marathi]

गणपती बाप्पा मोरया! हा नारा आपल्या मनातून सहज उमटतो. भारतात लहानापासून तर मोठया पर्यंत सगळे आरतीच्या वेळी ह्या मंत्राचा उचचार करतात, गणेश मंत्र हा केवळ एक मंत्र नाही तर एक अमोघ शक्ती आहे जी सर्वांना प्रदान केली जाते. हा मंत्र चंतन्याने आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि सकारात्मक उर्जेला आकर्षित करते, सर्वाना एकत्रित करून राग द्वेष नाहीसा करतो व सर्वांमध्ये आदराची भावना निर्माण करते.

गणेश मंत्र: एक अमोघ शक्ती: वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥[Vakratunda mahakaya in marathi]: वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ गणेश मंत्र सर्वांना माहित आहे परंतु ह्याचा अद्भुत प्रभाव माहित आहे का?

“वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥” हा मंत्र गणपतीचे स्तुतिमंडन करतो. कितीतरी काळांपासून हे आपल्याला माहित आहे कि गणपतीला विघ्नहर्ता म्हणून ओळखले जाते. बरेच हिंदू गणेशाचे चित्र, स्टिकर आपल्या गाडीवर लावतात जसेकि कार, बस, स्कूटीला देखील लावता. हा मंत्र चंतन्याने आपल्या जीवनातील अडथळे दूर करतो आणि सर्व कार्य सुकर घडवून आणतो. या मध्ये देवी महाकालीपेक्षा मोठी शक्ती आहे ज्याच्यामध्ये कोटी सूर्यप्रणाम आहे जे आपल्यासर्वांना जीवनदान देते.

गणेश मंत्र जादू व त्याचे अनेक फायदे आहेत. जर मनात एकाग्रता नसेल तर तो मन शांत करतो व आपल्याला फोकस ठेवतो, शरीरावरचा ताण-तणाव दूर करतो आणि सकारात्मक विचारांना जवळ आणून त्याला प्रोत्साहन देतो. त्यामुळे आपल्या शरीराला ताकत व बुद्धीला एक हवासारखा मार्ग दाखवते, याशिवाय, हा मंत्र बुद्धी तीक्ष्ण करतो, स्मरणशक्ती वाढवतो आणि एकाग्रता वाढवतो.

चला तर जाणून घेऊया कि काय वर कोणते शास्त्रीय आहेत ह्या मंत्रांचे व त्याने आपल्या शरीरातील कोणत्या ऊर्जा केंद्रांना प्रभावित करते? ह्या मंत्रामुळे शरीरात खूप मोठा बदल होतो , त्याच्या स्वरामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते. याशिवाय, मंत्र रोज उचारल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि महत्वाचे म्हणजे नकारात्मक ऊर्जा कमी करते. तुमचे शरीर असो वा घर किंवा आजूबाजूचा परिसर असो, गणेश मंत्रजप करण्यासाठी कोणत्याही विशिष्ट वेळीच किंवा ठिकाणी बसण्याची गरज नाही. आपण कोणत्याही वेळी, कोणत्याही ठिकाणी बसून हा मंत्र चंतन करू शकता. मात्र, सकाळी उठल्यावर किंवा रात्री झोपण्यापूर्वी हा मंत्र चंतन करणे अधिक फायदेशीर ठरू शकते. तसेच काही विशेष तयारी करण्याची गरज नाही, आपण स्वच्छ कपडे घालून शांत मनस्थितीत बसून हा मंत्र जप करायला पाहिजे. सर्वात आधी आपण मंत्राचा अर्थ समजून घेतला तर अधिक चांगले.

गणेश मंत्र चिंतन करण्यासाठी आपण मंत्राचे स्पंदन जाणवू द्या. मंत्राचे स्पंदन आपल्या शरीरात जाणवू लागले की आपण त्याचा अनुभव घेऊ शकतो. त्याचे विब्रेशन जेव्हा नासोनासी गेली कि मग मंत्राचा प्रभाव अधिक वाढतो. गणेश मंत्र मनन करून आपण आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणू शकतो. हा मंत्र आपल्याला सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंदाचे वरदान प्रदान करतो. गणेश मंत्र हा आपल्या जीवनातील अनेक समस्यांचे निराकरण करण्याची शक्ती देतो. त्यामुळे, आपण आजच गणेश मंत्र जपायला सुरुवात करूया आणि आपल्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणूया.