Sunday, 6 September 2026 | 8:59 PM
संस्कृती • परंपरा • आधुनिक विचार
6 Sep, 2026 | 8:59 PM

Book Review: नाते संबंधातील समस्या? हि पुस्तके नक्की वाचा

Relation nata jodtanna: रिलेशन्स चा नातं जोडताना book review

माणसं शास्त्र आणि नाते संबंध या विषयावर इंग्रजी भाषेत विपुल लेखन उपलब्ध आहे. परंतु मराठी भाषेत हा विषय फारसा हाताळला गेलेला नाही.  आपली एकत्र कुटूंब प्रधान संस्कृती, जरी आता ती विभक्त कुटूंब पद्धती झाली असली तरी आपण नाती जपतो, आणि सांभाळतो. पण अलीकडच्या विज्ञान  युगात तसेच जेन झी  युगात ही  संस्कृती टिकावी ह्यासाठी लेखिका करत असलेला प्रयत्न कौतुकास्पद  आहे.

कॉम्पुटर समोर  तासनतास बसणाऱ्या आजच्या पिढीचा संयम किंवा ऑनलाईन खरेदी करतां दिसत असलेला चौकसपणा जीवनातील निर्णय घेताना दिसत नाही. नवीन पिढीचे शिक्षण व करिअर  वाढत असलेले  लग्नाचे वय, लग्नानंतरचे मनात रमलेले चित्र व वास्तविकता, घर व ऑफिस चा ताण वेग-वेगळा करता न आल्याने, इत्यादी अनेक कारणामुळे नात्यांमध्ये ताण वाढत जातो. याचा परिणाम म्हणून की  काय घटस्फोटाचे समाजात वाढत असलेले प्रमाण खरोखरच चिंतेची बाब आहे.

रिलेशन्स चा नातं जोडताना
रिलेशन्स चा नातं जोडताना

हि चिंतेची बाब लक्षात घेउन डॉ. स्मिता प्रकाश जोशी या लोकसत्ता दैनिकात दार आठवड्याला स्तंभ लेख लिहू लागल्या. हे सर्व लिखाण व काही नव्याने लिखाण करून त्या सर्वांचे एक नव्हे तर तब्बल तीन पुस्तके सकाळ प्रकाशकाने २४ ऑगस्ट २०२५ ला प्रकाशित केली. पुस्तकांची नवे: १.रिलेशन्स चा नातं जोडताना २. रिलेशन्स नाते निभावताना ३. रिलेशन्स नातं तुटताना आणि नव्याने जोडताना

. ह्या तीनही पुस्तकात त्यांनी जीवनातील नाते संबंधात येणाऱ्या अनेक वेगवेगळ्या समस्या अगदी सहजतेने हाताळल्या आहेत. जसे सासू होण्याचे दडपण , लग्नाचा प्रोबेशियन पिरियड निर्णयाची घाई कशाला?, स्मार्ट पालकत्व , रॉकेट फिलिंग, नात्यांचं सर्व्हिसिंग, स्पर्शाचा हेतू, married बॅचलर,शरीर संबंधाचे वय असत?, वृद्धत्वात लिव्ह इन रिलेशनशिप, मला दोन आईबाबा कशे, ग्रे डिव्होर्स इत्यादी. नाते संबंध आणि त्यातील एकूणच सर्व नाते संबंधतीत खाचाखोचा चा उहापोह केल्या बद्धल डॉ. स्मिता प्रकाश जोशी यांचे खूप खूप कौतुक आणि अभिनंदन.

जीवन जगताना वेगवेगळ्या वळणावर समुपदेशकांची गरज भासते  हे त्यांनी आपल्या कथा रूप लेखात अधोरेखित केले आहे. पुस्तक वाचतांना जणू काही  त्या आपल्या आजुबाजूला घडणाऱ्या घटना त्या सांगत आहे असेल मला वाटले .  त्यांची ओघवती शैली, त्यांचा सकारात्मक दृष्टीकोन आणि समुपदेशक या क्षेत्रांतील त्यांचा प्रचंड अनुभव आपल्याला दिसून येतो. त्यांची मोजक्या शब्दात समस्या आणि समाधान मांडण्याची हातोटी वाखाणण्याजोगी आहे. त्यांच्या नवनवीन संकल्पना व आजच्या पिढीचा ट्रेंड, जसे लाँग डिस्टन्स लग्नं , आइस ब्रेकिंग, प्लॅटोनिक लव्ह ,, क्रॉस ड्रेसिंग, इत्यादी मुळे जेन झी शी चांगलाच सूर जुळत असेल,  ह्यात नवल ते काय? डॉ . स्मिता ताई एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या, लग्नं लोणच्यासारखे सारखं मुरावे लागते त्यासाठी दोघांना वेळ द्यावा  लागतो हे आपल्याला ही पटत. 

प्रत्येक पुस्तकाला संवेदनाशील व नावाजलेल्या मान्यवरांनी व दिग्जांनी ,   त्या त्या क्षेत्रात उच्च पदावर काम काम करणाऱ्यांनी  प्रस्तावना दिल्या आहे. अर्थात त्या अतिशय बोलक्या व समर्पक आहेत. संतोष घोंगडे यांनी सर्व पुस्तकांना विषयानुरूप आणि समर्पक रंगीत मुखपृष्ठ केली आहेत. प्रत्येक कथेच्या सुरवातीची रेखाचित्र सुद्धा विषयाच्या अनुषंगाने काढली आहेत. ही पुस्तके कौटुंबिक न्यायालयात, ,वकील ,पत्रकार, समुपदेश  या क्षेत्रात काम काम करणाऱ्यांना आणि प्रत्येक घरात मार्गदर्शक ठरतील.