shaili magazine

आज नाना पाटेकर मराठी सिनेमाचा अजातशत्रू झाले ७४ वर्षाचे

नाना पाटेकर यांचा आज वाढदिवस! मराठी आणि हिंदी सिनेमात त्यांच्या योगदानाची ओळख घ्या. त्यांच्या प्रेरणादायी प्रवासासाठी ही पोस्ट वाचा.
नाना पाटेकर यांचा आज वाढदिवस! मराठी आणि हिंदी सिनेमात त्यांच्या योगदानाची ओळख घ्या. त्यांच्या प्रेरणादायी प्रवासासाठी ही पोस्ट वाचा.
नाना पाटेकर वनवास मध्ये

आज मराठी सिनेमाचा अजातशत्रू म्हणून ओळखला जाणारा नाना पाटेकर आपला वाढदिवस साजरा करत आहे. आपल्या खंबीर अभिनयाने आणि वास्तववादी भूमिकांनी त्यांनी मराठीसह हिंदी सिनेमात एक वेगळी छाप उमटवली आहे.

Candid Conversation: Nana Patekar & Aamir Khan | On Set Off Script

नाना पाटेकर: मराठी सिनेमाचा अजातशत्रू

नाना पाटेकर यांचा जन्म 1 जानेवारी 1951 रोजी, मुरुड जंजिरा इथे झाला, हे गाव मुंबई जवळ आहे. एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या नानांच्या वडिलांना तमाशा बघायला खूप आवडायचं. त्यांचे वडील त्यांना बघायला सोबत न्यायचे, आणि तेव्हापासून त्यांना नाटक बघण्याची आवड निर्माण झाली. नंतर ते शाळेच्या नाटकामध्ये काम करू लागले, काही दिवसांपुर्वी आमिर खान सोबत, चर्चेत त्यांनी सर्वांना सांगितलं. आमिर खान यांनी पण त्यांची खूप स्तुती केली, त्यांच्या कठोर परिश्रमातून ही यशस्वी कारकीर्द घडवून काढली. त्यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केल असून प्रत्येक भूमिकेत त्यांनी आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. आज नाना पाटेकर ७४ वर्षाचे झाले व बॉलीवूड मध्ये आजही ते कार्यरत आहे.

नाना पाटेकरांनी आज गाठला वय ७४, आजही ते फिट व स्ट्रॉन्ग आहे. त्यांची नवीन सिनेमा “अपनेही देते है अपनोको वनवास” सिनेमाघरात २० डिसेंबर पासून उपलब्ध आहे.

वनवास सिनेमाघरात २० डिसेंबर पासून उपलब्ध आहे.

मध्यंतरी त्यांना अनिल कपूर यांनी विचारले कि तुम्ही कसेकाय डायलॉग डिलिव्हरी करता? तेव्हा त्यांनी सांगितलं व त्यांचे बरेच कलाकारांना सांगणं आहे कि स्क्रिप्ट वाचून-वाचून मनात एवढी आत्मसात करा कि ती झोपता, उठता, बसता तुम्हाला डायरेक्टरन जर विचारलं तर २० वर्षानं पण ते लक्षात राहिल पाहिजे. नाना पाटेकर यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेक पुरस्कार पटकावले आहेत. राष्ट्रीय फिल्म पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार यासारखे प्रतिष्ठित पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. त्यांच्या अभिनयाचे कौतुक देशभरातच नव्हे तर परदेशातही केले जाते.

नाना पाटेकर हे केवळ अभिनेते म्हणूनच नाही तर दिग्दर्शक आणि निर्माता म्हणूनही प्रसिद्ध आहेत. त्यांनी काही चित्रपट दिग्दर्शित आणि निर्मित केले आहेत. त्यांच्या प्रत्येक चित्रपटाची प्रेक्षकांनी उत्सुकतेने वाट पाहिली जाते. नाना पाटेकर यांच्या चित्रपटांमधील संवाद आजही प्रेक्षकांच्या ओठांवर असतात. त्यांच्या भूमिकांमधील वास्तववाद आणि खंबीरपणा हीच त्यांची ओळख आहे. त्यातला एक म्हणजे ‘एक मच्छर आदमीको हिजडा बाना देता है‘ असे बरेच त्यांचे डायलॉग लाखों चाहत्यांच्या ओठांवर येते. नाना पाटेकर यांच्या व्यक्तिमत्त्वाची एक खास गोष्ट म्हणजे त्यांची सामाजिक जागरूकता.

नाना अनेक सामाजिक कार्यात सक्रिय सहभागी असतात. नाना पाटेकर हे मराठी सिनेमाचे खरे दिव्य. त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने त्यांना हार्दिक शुभेच्छा! त्यांचे दीर्घ आयुष्य होवो, हीच प्रार्थना. मला त्यांचे बरेच सिनेमा आवडते, त्यातले काही शक्ती ज्यामध्ये करिना कपूर आहे, शारुख खान आहे, ज्यामध्ये त्यांनी एका जालीम सासऱ्याची भूमिका निभावली. परिंदा मधल काम तर अख्या जगाला माहित आहे. आणि हो, नटसम्राट तर काही बोलायचं कामच नाही. तुमचा कोणता सिनेमा फेवरेट आहे ज्यात नानांनी काम केल, कंमेंट मध्ये नक्की कळवा.

राज ठाकरे यांची डोळेउघड ट्विटर पोस्ट: वाचा २०२५ चे महत्वाचे मुद्दे

राज ठाकरे यांनी महाराष्ट्र सैनिकांसाठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर भाष्य केले आहे. बदलांची दिशा काय? वाचा सविस्तर.

नवीन वर्षाच्या शुभेच्छांसह राज ठाकरेंनी तुम्हाला सांगितले कि गेल्या २५ वर्षांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून सर्वांनी अनेक चढ-उतार पाहिले आहेत. हा काळ पूर्ण बदलांनी व्यापलेला असूनही काही समस्या आजही कायम आहेत ज्यासाठी त्यांना झटायचे आहे.

महाराष्ट्राच्या राजधानीत मराठी माणसाची असुरक्षितता असे त्यांनी सांगितले. त्यांना अजूनही बेरोजगारीचे संकट डोळ्यासमोर दिसत आहे. त्याचबरोबर महागाईमुळे होरपळणारे जीवन यांसारख्या मुद्द्यांनी आपण सर्वांनी जागरूक राहायला पाहिजेत.

राज ठाकरे यांनी महाराष्ट्र सैनिकांसाठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर भाष्य केले आहे. बदलांची दिशा काय? वाचा सविस्तर.
राज ठाकरे नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर भाष्य केले आहे.

त्यांनी व त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नेहमीच लोकांच्या मनामध्ये एक विश्वास निर्माण केला. मात्र सगळं वाया जातांनी दिसतं. ते म्हणतात कि मतदानाच्या वेळेस सगळे विसरून जातात. ह्या खंतावणाऱ्या सत्यासोबत आपण सर्व जगत आहो. तरीही, आपण या गोष्टी मागे ठेवून नव्या उमेदीने कामाला सुरुवात केली पाहिजे. विधानसभेच्या निकालांनंतर राज ठाकरेंनी काही काळ राजकीय भाषणे टाळली, पण आता विचारमंथनाच्या टप्प्यानंतर लवकरच सविस्तर बोलण्याचा मानस आहे.

राज ठाकरे यांची ट्विटर पोस्ट आपल्यांना जागवून करून जाते, वाचा त्यांची पोस्ट

माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना सस्नेह जय महाराष्ट्र, सर्व प्रथम सर्वांना इंग्रजी नवीन वर्षाच्या शुभेच्छा ! कालगणनेत या वर्षाला एक महत्व आहे , कारण या शतकातील, पाव शतक संपायला आलं. माणसाच्या आयुष्यातल्या जवळपास प्रत्येक क्षेत्रांत इतके प्रचंड बदल झालेत की २५ वर्षांपूर्वीच आयुष्य हे वेगळं युग वाटावं. या २५ वर्षांच्या कालखंडात आपला पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना ज्याची स्थापना झाली, तो स्थिरावला, पक्षाने अनेक चढउतार पाहिले. आणि हे सगळं आपल्या सगळ्यांना खूप काही शिकवून गेलं. या २५ वर्षांत जरी खूप बदल झाला असला तरी अनेक गोष्टी तशाच राहिल्यात, मुंबईसारख्या महानगरात जी महाराष्ट्राची राजधानी आहे, तिथे मराठी माणसाला असुरक्षित वाटणं. तरुण मुलामुलींच्या हाताला काम न मिळणे पण त्याच वेळेस बाहेरच्या राज्यातून येणाऱ्यान नोकरीच्या संधी मिळणं. बेरोजगाराला जात नसते, पण त्याला ती जात जाणवून देऊन, जातीजातीत भांडणं लावणं. शेतकऱ्यापासून ते सर्वच कष्टकऱ्यांच आयुष्य महागाईने होरपळून निघणं. आणि या आणि इतर प्रत्येक समस्येच्या वेळेस लोकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आठवण होणे, पण नेमकं मतदानाच्या वेळेस पक्षाचा विसर पडणे. पण ठीक आहे, हे स्वीकारून आपण आता काही बदलांसकट पुढे जायला हवं. २३ नोव्हेंबर २०२४ रोजी विधानसभेचे निकाल लागल्यानंतर मी काही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झालो, पण मुद्दाम राजकीय भाष्य टाळलं. नक्की काय घडलं यावर माझं मंथन सुरु आहे आणि लवकरच मी या सगळ्यावर सविस्तर बोलेन. पण महाराष्ट्र सैनिकांना माझं आवाहन आहे की जे घडलं ते विसरून जा. निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर पुढे काही आठवड्यातच मराठी माणसांविरोधात दंडेलशाही सुरु झाली, आणि त्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दणका द्यावा अशी अपेक्षा व्यक्त झाली आणि जे आपण केलं देखील. मुळात मराठी माणूस हा फक्त मतदानासाठी वापरला जातोय हे वास्तव अधोरेखित झालं. त्यात महिलांविरोधात अत्याचार वाढतच आहेत. राज्यातले दोन समाज जे दोन्ही मराठी भाषिक, पण त्यांच्यात संघर्ष पेटला आहे. आणि महागाईने लोकं होरपळली आहेत. असं असताना महाराष्ट्र सैनिकांनी स्वतःच्या मनातील खंत आता बाजूला ठेवली पाहिजे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपण काहीच करत नाही, त्यामुळे या सगळ्यात आता कृती करण्याची जबाबदारी आपलीच आहे. मी मागे म्हणलं तसं मराठीवर कोणी हल्ला केला तर मराठी म्हणून आणि हिंदू माणसाच्या गळ्याला नख लावलं तर हिंदू म्हणून मी अंगावर येईन, ते आपण करत आहोतच. पण राज्यात महिलांच्यावर जे अत्याचार होत आहेत, त्याच्यासाठी एक संपर्क कक्ष पक्षाच्या कार्यालयात सुरु करा. महिलांच्या तक्रारी नोंदवून घेतल्या जात नसतील तर त्याचा पाठपुरावा करा. आणि तरीही काही घडलं नाही तर हात मोकळे सोडून अत्याचार करणाऱ्या त्या नराधमाना चांगलं फोडून काढा. महागाईने होरपळलेल्याना दिलासा द्यायला हवा, यासाठी साठेबाजी होत नाहीये ना, हे पाहून त्याची सूचना संबंधित खात्याना करा आणि त्याच्या जोडीला शेतकरी आणि ग्राहक यांच्यातील दुवा बनण्याचा प्रयत्न करा. थोडक्यात आपल्या शाखा, कार्यालयं पुन्हा एकदा लोकांसाठी खुली करा. आणि हो, हे सगळं करताना सोशल मीडिया आपल्या कामाच्या प्रचार प्रसारासाठी वापरायचा आहे पण सोशल मीडिया तुम्हाला वापरत नाहीये ना, त्याच्या अधीन जात नाही आहोत ना हे पहा. लवकरच मी सविस्तर बोलेन, त्यात अधिक व्यापक दिशा तुम्हाला देईनच. तोपर्यंत नवीन वर्षासाठी आणि पुन्हा नव्याने कामाला सुरुवात करण्यासाठी शुभेच्छा !

राज ठाकरे ।

असे म्हणत त्यांनी नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र सैनिकांना नव्या ऊर्जेने कामाला लागण्याचे आवाहन केले आहे.

राज ठाकरे यांच्या या संदेशात महाराष्ट्र सैनिकांसाठी विचार करण्यासारखे मुद्दे आहेत. पक्षाची दिशा बदलांसह ठरवताना राज ठाकरे यांचा हा मार्गदर्शक संदेश प्रेरणादायी ठरेल.

नरेंद्र मोदींचं पत्र आणि हिरवाईची सेना (Green Army) निर्मला देवी, काय आहे हि ग्रीन आर्मी?

Green Army: भारताची ग्रीन आर्मी काय आहे, त्यांचा काय कार्य आहे जाणून घ्या सविस्तर. बराच गावातली त्यांनी नसा मुक्ती व...
Green Army: भारताची ग्रीन आर्मी काय आहे, त्यांचा काय कार्य आहे जाणून घ्या सविस्तर. बराच गावातली त्यांनी नसा मुक्ती व...
भारताची ग्रीन आर्मी

ग्रीन आर्मी हे एक बायकांची सेने आहे ज्यांनी गावातील नाश जसेकी दारू, जुवा आणि बर्याच वाईट सवयी गावातून पूर्णपणे नाहीशी केली. त्यांच्या गटात तीस पेक्षा जास्त बाया आहे ज्यांनी हे सर्व घडवून आणल. हे सर्व बघून भारताचे पंतप्रधान यांनी ग्रीन आर्मीला एक पत्र लिहिले. हे पत्र वाचून ग्रीन आर्मी खूप खुश झाली.

वारणासीजवळील देवरा या छोट्याशा खेड्यात राहणारी निर्मला देवी विचार करत होती, “तो हे घालेल, तर साऱ्या जगाला कळेल!” ‘हिरवाईची सेना’ या महिलांच्या संघटनेची स्थापना आत्मनिर्भरतेसाठी झाली होती. त्यांनी चप्पल तयार करणाऱ्या कारखान्याची सुरुवात केली. परंतु त्यांनी बनवलेला पहिला जोडा विक्रीसाठी नव्हता, तो एका खास व्यक्तीसाठी होता.

निर्मला देवीची हि ग्रीन आर्मी

मनात आशा आणि विश्वास घेऊन त्यांनी तो जोडा पाठवला. “जर त्यांनी तो घातला, तर आपली कहाणी जगाला कळेल आणि स्वप्न साकारतील,” असे त्या महिलांना वाटत होते. काही दिवसांनी एक पत्र आलं. निर्मला देवीने ते हातात घेतलं आणि आनंदाश्रूंनी तिचे डोळे चमकले. “हे पत्र वाचताना वाटलं, जणू नरेंद्र मोदी स्वतः इथे आले आहेत!” ती भावूक झाली. हे पत्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं होतं. त्यांनी ‘हिरवाईची सेना’च्या बहिणींच्या उपक्रमाचे मनापासून कौतुक केलं होतं.

वाचा नरेंद्र मोदीजीनी Green Army साठी काय लिहिले: “तुमच्या चप्पल कारखान्याबद्दल ऐकून मला आनंद झाला. तुमचं ठाउत्फुल भेटवस्तू सादर करणं खूप प्रेरणादायक आहे. देश आणि समाजाच्या प्रगतीसाठी तुमचं योगदान अभिमानास्पद आहे,” असे त्या पत्रात लिहिले होते.

‘हिरवाईची सेना’साठी हा गौरवाचा क्षण होता. त्यांच्या मेहनतीला मिळालेलं हे मान्यत्व आणि प्रोत्साहन, त्यांची स्वप्नं सत्यात आणण्यासाठी ऊर्जा देणारं ठरलं. या महिलांनी आधीच गावात नशाबंदी आणि जुगारविरोधी जनजागृती केली होती, मुलीच्या जन्माचा उत्सव साजरा करण्याची परंपरा सुरू केली होती आणि हुंडाविरोधी लढा दिला होता. त्यांचे कार्य आता देशाच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचले होते.

“चौपट आनंद वाढला!” निर्मला देवी म्हणाली, या अभिमान आणि आनंदाच्या क्षणाला शब्द देत. ‘हिरवाईची सेना’साठी ही केवळ सुरुवात होती.

हिरवाईची सेना: महिलांच्या सामर्थ्याची प्रेरणा त्यांनी जे केले ते केवळ गावासाठी नव्हे, तर संपूर्ण देशासाठी एक आदर्श घालून दिला. त्यांचा आत्मविश्वास आणि मेहनत सर्वांना प्रेरणा देणारी आहे. निर्मला देवी आणि ‘हिरवाईची सेना’चा प्रेरणादायी प्रवास, पंतप्रधान मोदींचं कौतुक, आणि त्यांच्या कामगिरीचं देशभर कौतुक.

मीन: राशि भविष्य (आजचे)

मीन राशी भविष्य आजचे

तुमच्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणा. शुभ रंग: पिवळा, शुभ अंक: २ उपाय: तुमच्या स्वप्नांना आणि भावनिक बंधनांना चालना द्या.

New Year साठी बेस्ट शुभेच्छा, Whatsapp संदेश, कोट्स आणि ग्रीटिंग्स, Status & Messages

New Year वर्षासाठी बेस्ट शुभेच्छा, Whatsapp संदेश, कोट्स आणि ग्रीटिंग्स, Status & Messages

नवीन वर्षाचे स्वागत नेहमीच आनंदाने आणि उत्साहाने करावे. आपल्या प्रियजनांसाठी काही खास शुभेच्छा संदेश, कोट्स, आणि ग्रीटिंग्स निवडून त्यांचे नवीन वर्ष खास बनवा. येथे आम्ही बेस्ट संदेशांची यादी सादर करत आहोत.

New Year वर्षासाठी बेस्ट शुभेच्छा, Whatsapp संदेश, कोट्स आणि ग्रीटिंग्स, Status & Messages

नोट: फोटो स्टेटस डाउनलॊड करण्यासाठी फोटोवर बोट दाबून धरा, “Download option” सिलेक्ट करा.

नवीन वर्षासाठी बेस्ट शुभेच्छा संदेश

  • “नवीन वर्ष आपल्यासाठी आनंद, आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो.”
  • “जुने जाईल आणि नवीन येईल, तुमच्या स्वप्नांना नवे पंख मिळोत.”
  • “तुमच्या प्रत्येक दिवसाला नवीन आशा आणि आनंदाने भरवा.”

बेस्ट नवीन वर्षाचे कोट्स

  • “नवीन वर्ष म्हणजे नवीन सुरुवात आणि संधींचा सोहळा.”
  • “प्रत्येक क्षण नव्या गोष्टी शिकण्यासाठी असतो.”
  • “भूतकाळ विसरून पुढच्या क्षणांसाठी प्रेरणा घ्या.”

मित्रांसाठी विशेष संदेश

  • “माझ्या खास मित्रासाठी नवीन वर्ष आनंददायी ठरो.”
  • “आपण नेहमी हसत राहू आणि नवीन स्वप्न साकार करूया.”
  • “या वर्षात आपली मैत्री आणखी घट्ट होवो.”

कुटुंबासाठी शुभेच्छा

  • “तुमच्या आधाराने आणि प्रेमाने माझे जीवन समृद्ध झाले आहे.”
  • “हे नवीन वर्ष आपल्यासाठी आरोग्य, सुख आणि समाधान घेऊन येवो.”
  • “माझ्या कुटुंबासाठी हे वर्ष आनंदाने भरलेले असो.”

प्रेरणादायी ग्रीटिंग्स

  • “तुम्हाला यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी नवीन वर्ष उत्तम संधी देईल.”
  • “आशावादी रहा आणि तुमच्या स्वप्नांची पूर्तता करा.”
  • “प्रत्येक दिवस तुमच्यासाठी एक नवीन सुरुवात आहे.”

वैयक्तिक संदेश

  • “तुमच्या आनंदासाठी मी नेहमीच तुमच्या सोबत आहे.”
  • “तुमचं स्वप्न साकार करण्यासाठी मी तुम्हाला पाठिंबा देतो.”
  • “हे नवीन वर्ष तुमचं जीवन आनंदाने आणि उत्साहाने भरून टाको.”

व्यावसायिक शुभेच्छा

  • “तुमच्या व्यवसायात नवा जोम आणि यश मिळवण्याची ही वेळ आहे.”
  • “सहकार्याच्या नवीन संधी तुम्हाला पुढे घेऊन जातील.”
  • “प्रत्येक व्यावसायिक टप्पा तुमच्या यशाला नवे आयाम देईल.”

प्रेमळ ग्रीटिंग्स

  • “तुमच्या जीवनात प्रेम, आनंद आणि शांती नेहमी राहो.”
  • “तुमच्या प्रत्येक स्वप्नाला माझ्या शुभेच्छांचा आधार आहे.”
  • “तुमचं नवीन वर्ष माझ्या प्रेमाने भरलेलं असो.”

या संदेशांचा उपयोग करून तुमच्या प्रियजनांना शुभेच्छा द्या आणि त्यांचे नवीन वर्ष खास बनवा. प्रत्येक शुभेच्छांमध्ये तुमचं प्रेम आणि आदर दाखवा.

संतोष पंडितराव देशमुख: मस्साजोग गावातील धक्कादायक घटना

मस्साजोग गावचे माजी सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांच्या अपहरण आणि खुनामुळे गावात खळबळ. जाणून घ्या नेमकं काय घडलं.
मस्साजोग गावचे माजी सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांच्या अपहरण आणि खुनामुळे गावात खळबळ. जाणून घ्या नेमकं काय घडलं.
संतोष पंडितराव देशमुख

संतोष पंडितराव देशमुख, बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातल्या मस्साजोग गावचे माजी सरपंच होते. ते सगळ्या वयोगटातल्या लोकांशी सहजपणे संवाद साधायचे, त्यामुळे गावात ते अत्यंत लोकप्रिय होते. त्यांच्या कार्यकाळात गावाच्या विकासासाठी त्यांनी अनेक प्रकल्प राबवले, ज्यामुळे त्यांची गावकरी मोठ्या प्रमाणात प्रशंसा करायचे.

सरपंच संतोष पंडितराव देशमुख धक्कादायक घटना

सध्याचे मस्साजोग गावचे सरपंच त्यांच्या पत्नी अश्विनी देशमुख आहेत. संतोष देशमुख यांचा गावाशी आणि गावकऱ्यांच्या अडचणींशी दैनंदिन संपर्क कायम होता. माजी सरपंच असूनही ते गावाच्या भल्यासाठी सतत कार्यरत होते. त्यामुळे त्यांच्या निधनाची बातमी गावासाठी मोठा धक्का ठरली.

घटनाक्रम अधिक धक्कादायक होता. ९ डिसेंबर २०२४ रोजी, भर दुपारी संतोष देशमुख यांचे फिल्मी पद्धतीने अपहरण करण्यात आले. काही तासांतच त्यांचा मृतदेह रस्त्यावर सापडला. त्यांच्या अपहरणामागे आणि खुनामागे नेमके कोण आणि का होते, याचा तपास पोलिस करत आहेत.

या घटनेमुळे मस्साजोग गाव आणि परिसरात प्रचंड संताप उसळला. गावातील लोकांनी अहिल्यानगर-अहमदपूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. या दरम्यान, केजमधील काही आंदोलकांनी बस पेटवून दिली, ज्यामुळे परिस्थिती आणखी चिघळली.

संतोष देशमुख यांच्या हत्येने गावकरी हादरले. त्यांची हत्या का झाली, यामागील कारण काय, आणि कोणत्या व्यक्तींनी ही गंभीर कृती केली, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले. पोलिसांनी या प्रकरणात तातडीने तपास सुरू केला आणि काही आरोपींना अटक करण्यात यश मिळवले.

मस्साजोगमधील खळबळजनक हत्याकांड: सत्य समोर येईल का?

मस्साजोगसारख्या शांत गावात इतकी गंभीर घटना घडणे लोकांना अस्वस्थ करणारे ठरले. संतोष देशमुख यांनी गावासाठी केलेल्या भल्यामुठ्या कामांचा विचार करता, त्यांचा मृत्यू गावासाठी अपरिमित नुकसान आहे.

आंदोलनादरम्यान पोलिसांनी सुरळीतपणा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. गावकऱ्यांनी मात्र या प्रकरणात जलद न्यायाची मागणी केली. या दुर्दैवी घटनेनंतर गावकऱ्यांनी एकजुट दाखवत संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला पाठिंबा दिला.

संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्येने अनेकांना हादरवले आहे. त्यांच्या योगदानाची आठवण ठेवून गावाने त्यांच्या कुटुंबाला बळ दिले आहे. पोलिस तपासावर गावकऱ्यांचे लक्ष आहे, आणि या प्रकरणात न्याय मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

मस्साजोगच्या इतिहासात या घटनेने मोठी खळबळ उडवली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास पूर्ण होईपर्यंत गाव शांत बसणार नाही, अशी भावना अनेक गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

संतोष पंडितराव देशमुख यांच्या हत्येच्या मागचं सत्य शोधण्यासाठी मस्साजोग गावकऱ्यांची संघर्षयात्रा सुरू आहे. या प्रकरणात न्याय मिळेल का?

प्राजक्ता माळीच्या नावावरून वाद: सुरेश धस यांच्यावर टीका

बीड सरपंच हत्या प्रकरणी प्राजक्ता माळीच्या नावाचा गैरवापर केल्याचा आरोप; अभिनेत्रीने महिला आयोगात तक्रार दाखल करून प्रतिक्रिया दिली.
बीड सरपंच हत्या प्रकरणी प्राजक्ता माळीच्या नावाचा गैरवापर केल्याचा आरोप; अभिनेत्रीने महिला आयोगात तक्रार दाखल करून प्रतिक्रिया दिली.
बीड सरपंच हत्या प्रकरणी प्राजक्ता माळीच्या नावाचा गैरवापर केल्याचा आरोप

सध्या बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून भाजप आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीचं नाव घेतलेलं वक्तव्य चर्चेत आलं. या वक्तव्यावर प्राजक्ता माळीने मुंबईत पत्रकार परिषद घेऊन कडाडून उत्तर दिलं. प्राजक्ताने सांगितलं की, राजकारणासाठी महिला कलाकारांच्या नावाचा गैरवापर करणं हे अतिशय लाजीरवाणं आहे.

प्राजक्ता माळीने या संदर्भात महिला आयोगात तक्रार दाखल केली असून, तिने सुरेश धस यांची जाहीर माफी मागण्याची मागणी केली आहे. पत्रकार परिषदेत तिने म्हटलं, “मी शांत होते, याचा अर्थ माझी मूकसंमती नव्हती. राजकीय स्वार्थासाठी कलाकारांना ओढणं थांबलं पाहिजे.”

‘फुलवंती’ या सुपरहिट चित्रपटात मुख्य भूमिका साकारलेल्या प्राजक्ताला मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी पाठिंबा दर्शविला आहे. गश्मीर महाजनीनेही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी एनिथिंग’ सेशनदरम्यान चाहत्याने त्याला विचारलं, “प्राजक्ताच्या समर्थनार्थ तू काय बोलशील?” यावर गश्मीरने सांगितलं, “प्राजक्ता खंबीर, स्वतंत्र, आणि सशक्त स्त्री आहे. मी तिचा खूप आदर करतो.”

गश्मीरने ‘फुलवंती’ चित्रपटात शास्त्री बुवाची भूमिका साकारली होती. हा चित्रपट प्राजक्ताने स्वतः निर्मित केला होता. प्राजक्ता माळीला सचिन गोस्वामी, सुशांत शेलार, विशाखा सुभेदार, कुशल बद्रिके, आणि पृथ्वीक प्रताप यांसारख्या अनेक कलाकारांनीही पाठिंबा दिला आहे.

प्राजक्ता म्हणाली, “सुरेश धस यांनी जी टिप्पणी केली, ती वैयक्तिक स्वार्थासाठी होती. एखाद्या फोटोच्या आधारे असे आरोप करणे चुकीचे आहे.” तिने आपले अनुभव सांगत म्हणाले की, “महिला कलाकारांना सतत अशा प्रकारच्या परिस्थितींना सामोरे जावे लागते.”

बीडमध्ये सुरु असलेल्या सरपंच हत्या प्रकरणाचा तपास अजूनही सुरु आहे. यादरम्यान सुरेश धस यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. प्राजक्ता माळीच्या पत्रकार परिषदेनंतर मनोरंजन विश्वात तिच्या बाजूने एकजूट दिसून येत आहे. ट्विटरवर #boycottprajakta नावाचा डंका, सगळे मराठी बांधव ट्विट करत संगतफिरले.

प्राजक्ता माळीने राजकारणातील पुरुषप्रधान मानसिकतेला आव्हान देत तिचा आवाज उठवला आहे. कलाकारांवर होणाऱ्या अन्यायाला थांबवण्यासाठी तिचं पाऊल प्रेरणादायी आहे.

नवीन सिम कार्ड नियम 2025: आता कागदी कागदपत्रांचा त्रास संपवा

डिजिटल इंडिया पुढाकाराने दूरसंचार विभागाने सिम कार्ड प्रक्रिया सुलभ व सुरक्षित केली आहे. ई-केवायसी व आधार-आधारित सत्यापनासह पेपरलेस युगात आपले स्वागत!
डिजिटल इंडिया पुढाकाराने दूरसंचार विभागाने सिम कार्ड प्रक्रिया सुलभ व सुरक्षित केली आहे. ई-केवायसी व आधार-आधारित सत्यापनासह पेपरलेस युगात आपले स्वागत!
डिजिटल इंडिया पुढाकाराने दूरसंचार विभागाने सिम कार्ड प्रक्रिया सुलभ व सुरक्षित केली आहे.

दूरसंचार विभागाने (DoT) सिम कार्ड खरेदी आणि बदलण्याच्या प्रक्रियेत मोठे बदल केले आहेत. एअरटेल, रिलायन्स जिओ, बीएसएनएल, आणि व्होडाफोन-आयडिया (Vi) सारख्या मुख्य दूरसंचार कंपन्यांसाठी सुलभ व सुरक्षित प्रक्रियेची घोषणा करण्यात आली आहे. कागदपत्रांशिवाय प्रक्रिया पूर्ण होण्यामुळे वापरकर्त्यांना आता अधिक सुविधा आणि विश्वास मिळत आहे.

नवीन नियमांनुसार, सिम कार्ड खरेदी किंवा ऑपरेटर बदलण्यासाठी ग्राहकांना टेलिकॉम कार्यालयांना भेट देण्याची गरज नाही. संपूर्ण प्रक्रिया डिजिटल माध्यमांवर स्थानांतरित झाली आहे. सिम कार्ड खरेदी किंवा अन्य ऑपरेटरकडे पोर्ट करण्यासाठी ऑनलाइन सत्यापन प्रक्रिया निश्चित केली आहे, ज्यामुळे कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता उरली नाही.

ई-केवायसी आणि सेल्फ-केवायसीमुळे प्रक्रिया सुलभ झाली

ई-केवायसी (इलेक्ट्रॉनिक नो युअर कस्टमर) आणि सेल्फ-केवायसी या नव्या पद्धतींमुळे दूरसंचार सेवांचा उपयोग अधिक सोपा झाला आहे. यामुळे ग्राहक स्वत:च्या घरी बसून सत्यापन प्रक्रिया पूर्ण करू शकतात. प्रीपेड ते पोस्टपेड सेवा बदलणे किंवा नवीन सिम खरेदी करणे आता केवळ डिजिटल माध्यमांद्वारे करता येते.

सुरक्षा व सोयीसाठी आधार-आधारित ई-केवायसी प्रणाली लागू करण्यात आली आहे. ग्राहकांना केवळ 1 रुपयात (जीएसटीसह) आधार डिजिटल तपशील सत्यापित करून सिम कार्ड खरेदी करता येईल. यामुळे वेळेची बचत होऊन कागदपत्रांची गरज संपली आहे.

डिजीलॉकरद्वारे सेल्फ-केवायसी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ग्राहक आपली कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करून सत्यापन प्रक्रिया स्वत: हाताळू शकतात. ही सुविधा नवीन सिम खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी तसेच प्रीपेड ते पोस्टपेड सेवा बदलणाऱ्यांसाठी फायदेशीर आहे.

प्रीपेड ते पोस्टपेड सेवा बदलणे आता ओटीपीद्वारे (वन-टाइम पासवर्ड) शक्य झाले आहे. या डिजिटल सेवेमुळे ग्राहकांना टेलिकॉम ऑपरेटरच्या कार्यालयांना भेट देण्याची आवश्यकता उरली नाही, ज्यामुळे प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे.

नवीन डिजिटल नियमांचा उद्देश दस्तऐवजांचा गैरवापर व बनावट सिम कार्ड जारी करण्याच्या समस्यांना आळा घालणे आहे. प्रगत सत्यापन प्रणालीमुळे फसवणूक करणाऱ्या लोकांना सिम कार्ड मिळणे अवघड झाले आहे. दोषी आढळल्यास त्यांना सहा महिने ते तीन वर्षांसाठी सिम कार्ड मिळण्यास मनाई केली जाऊ शकते.

डिजिटल इंडिया पुढाकाराच्या दृष्टीने हे बदल दूरसंचार क्षेत्राला अधिक सुलभ व सुरक्षित बनवतात. डिजिटल साधनांचा वापर करून DoT ने सिम कार्ड खरेदी प्रक्रिया सुलभ केली आहे, ज्यामुळे ग्राहकांना चांगले अनुभव व सुरक्षा मिळते.

हे बदल दूरसंचार क्षेत्रातील वापरकर्ता अनुभव सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. कागदविरहित, आधार-संबंधित आणि ओटीपी-चालित प्रक्रिया सिम कार्ड खरेदीला जलद, सोयीस्कर आणि सुरक्षित बनवते.

नवीन सिम कार्ड नियम 2025 मुळे भारत डिजिटल युगात पुढे जात आहे. सुलभ व सुरक्षित प्रक्रिया आता प्रत्येक ग्राहकासाठी सहज उपलब्ध आहे.

महाराष्ट्र टेक्नीकल टेक्सटाईल मिशनची स्थापना – फडणवीस

Technical Textile: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात टेक्नीकल टेक्सटाईल मिशन आणि वस्त्रोद्योग विकासासाठी महत्त्वाच्या योजना जाहीर केल्या.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी टेक्नीकल टेक्सटाईल मिशन (Maharashtra Technical Textile Mission – MTTM) स्थापन करण्याची घोषणा केली आहे. यासह, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग विकास महामंडळ (MSTDC) स्थापन करण्याचाही निर्णय घेतला आहे. नवी दिल्ली येथे आयोजित भारत टेक्स २०२५ या कार्यक्रमात महाराष्ट्राचा सहभाग सुनिश्चित करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

Technical Textile: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात टेक्नीकल टेक्सटाईल मिशन आणि वस्त्रोद्योग विकासासाठी महत्त्वाच्या योजना जाहीर केल्या.
टेक्नीकल टेक्सटाईल मिशन आणि वस्त्रोद्योग विकासासाठी महत्त्वाच्या योजना जाहीर केल्या.

मुख्यमंत्र्यांनी टेक्निकल टेक्सटाईल पार्कसाठी अभिरुची पत्रे मागविण्यासाठी कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच स्थानिक वस्त्रोद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कॅप्टिव्ह मार्केट योजना प्रभावीपणे लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. या योजनेतून महाराष्ट्रातील पारंपरिक वस्त्रोद्योगाला अधिक ताकद मिळणार आहे.

हातमाग विणकरांच्या कल्याणासाठी निवृत्ती वेतन योजना राबवण्यावरही भर देण्यात आला आहे. या योजनेतून हातमाग विणकरांना सामाजिक सुरक्षा कवच दिले जाईल. राज्याच्या एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३-२८ अंतर्गत अर्बन हाट केंद्र स्थापन करण्याची योजना तयार करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.

टेक्नीकल टेक्सटाईल (Technical Textile) विकासासाठी नवे धोरण

मुख्यमंत्र्यांनी वस्त्रोद्योग क्षेत्रात नवकल्पनांच्या माध्यमातून प्रगती साधण्यासाठी ‘करघा’ या मालिकेचा पहिला भाग प्रसारित करण्यासाठी प्रसार भारतीसोबत सहकार्य करण्याची सूचना दिली आहे. यामुळे पारंपरिक वस्त्रोद्योग आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा समन्वय साधला जाईल.

राज्यातील वस्त्रोद्योग विभागाच्या योजनांचे डिजिटायझेशन आणि ऑटोमेशन करण्यावरही भर देण्यात येत आहे. याशिवाय, सूतगिरण्यांमध्ये सौर उर्जेचा वापर वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे निर्देश दिले आहेत. हे सर्व पाऊल वस्त्रोद्योगाच्या शाश्वत विकासासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित या आढावा बैठकीत, ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या पुढील १०० दिवसांच्या आराखड्याचा आढावा घेतला गेला. यामध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

बैठकीला राज्यातील विविध विभागांचे मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांसह अनेक महत्त्वाच्या व्यक्तींचा सहभाग होता.

मुख्यमंत्र्यांनी बैठकीत महाराष्ट्रातील वस्त्रोद्योग विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी नव्या संधी निर्माण करण्यावर भर दिला. यामध्ये वस्त्रोद्योग धोरण, टेक्नीकल टेक्सटाईल मिशन, आणि पारंपरिक वस्त्रनिर्मितीला चालना देणाऱ्या योजनांचा समावेश होता.

महाराष्ट्रातील वस्त्रोद्योग क्षेत्र नव्या उंचीवर नेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टेक्नीकल टेक्सटाईल मिशनची स्थापना करून मोठी पायाभरणी केली आहे.

ओसामु सुझुकी: १९८३ साली भारतात पैसे गुंतवण्याची प्रेरणादायक कहाणी

ओसामु सुझुकी यांनी १९८३ साली भारतात पैसे का गुंतवले? त्यांचा प्रेरणादायक प्रवास जाणून घ्या, ज्यामुळे मारुती ८०० भारतात घराघरात पोहोचली.
ओसामु सुझुकी यांनी १९८३ साली भारतात पैसे का गुंतवले? त्यांचा प्रेरणादायक प्रवास जाणून घ्या, ज्यामुळे मारुती ८०० भारतात घराघरात पोहोचली.
ओसामु सुझुकी यांनी १९८३

ओसामु सुझुकी कोण होते, आणि त्यांनी १९८३ साली भारतात पैसे का गुंतवले? हा प्रश्न विचारल्यावर आपल्याला एका असामान्य व्यक्तीची कथा समजते. ओसामु सुझुकी हे जपानच्या सुझुकी मोटर कंपनीचे प्रमुख होते. त्यांनी भारतात १९८२ मध्ये मारुती उद्योग लिमिटेड स्थापन करून, भारतीय ऑटोमोबाईल उद्योगाला एका वेगळ्या उंचीवर नेले. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतात सर्वांगीण लोकप्रिय ठरलेल्या मारुती ८०० ने लाखो कुटुंबांचे स्वप्न साकार केले.

ओसामु सुझुकी कुठे जन्मले व त्यांची सुरुवात कार बिसिनेस मध्ये कशी झाली?

PM meeting the Adviser, Suzuki Motor Corporation, Mr. Osamu Suzuki, in Japan on May 23, 2022.
PM meeting the Adviser, Suzuki Motor Corporation, Mr. Osamu Suzuki, in Japan on May 23, 2022.

ओसामु सुझुकी यांचा जन्म ३० जानेवारी १९३० रोजी जपानच्या गेरो गावात झाला. शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी लोण ऑफिसर म्हणून करिअरची सुरुवात केली. पुढे सुझुकी कुटुंबाने त्यांना दत्तक घेतले, ज्यामुळे त्यांच्या आयुष्यात मोठा बदल झाला. त्यांनी सुझुकी कंपनीत साध्या पदावर काम करत सुरुवात केली, पण त्यांच्या मेहनतीमुळे ते डायरेक्टरच्या स्थानापर्यंत पोहोचले.

१९७० च्या दशकात ओसामु यांनी जागतिक बाजारपेठेचा अभ्यास करण्यासाठी अनेक देशांचा प्रवास केला. भारतात गरीबी आणि मर्यादित संसाधनांच्या काळातही त्यांना भारताच्या प्रचंड संभावनेचा अंदाज आला. त्यानंतर, १९८२ मध्ये त्यांनी भारत सरकारसोबत भागीदारी केली आणि मारुती उद्योगाची सुरुवात केली.

मारुती ८०० ने भारतात ऑटोमोबाईल क्षेत्रात क्रांती केली. स्वस्त, टिकाऊ, आणि कमी खर्चिक ही कार सामान्य कुटुंबांसाठी वरदान ठरली. भारतीय बाजारात यशस्वी झाल्यामुळे ओसामु यांना मोठा फायदा झाला. त्यांच्या या उपक्रमामुळे अनेकांना रोजगार मिळाला आणि देशाच्या आर्थिक वाढीत हातभार लागला.

१९८० ते २००० च्या दरम्यान, सुझुकी मोटर्सने जगभरात आपली ओळख निर्माण केली. ६० प्लांट्स आणि ३१ देशांमध्ये व्यवसाय विस्तारल्यामुळे ही कंपनी जागतिक स्तरावर प्रसिद्ध झाली. ओसामु यांनी आपल्या नेतृत्वाखाली २००३ पर्यंत वार्षिक उत्पन्न १६ बिलिओन डॉलर्सपर्यंत नेले.

२००४ साली जपानमध्ये त्यांच्या यशाची दखल घेण्यात आली आणि सुझुकी कंपनीला देशातील नंबर १ कार निर्मातीचा दर्जा मिळाला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत २०१४ मध्ये झालेल्या चर्चेत त्यांनी भारतीय उद्योगाला प्रोत्साहन दिले.

२५ डिसेंबर २०२४ रोजी ओसामु सुझुकी यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या कर्तृत्वामुळे भारतीय उद्योगक्षेत्रात नवा इतिहास निर्माण झाला. त्यांनी घेतलेले निर्णय आणि दाखवलेला धाडस भारतासाठी नेहमीच प्रेरणादायी राहतील.

ओसामु सुझुकी यांची प्रेरणा कायम राहील

ओसामु सुझुकी यांची कथा केवळ यशाची नाही, तर धाडस, मेहनत, आणि दूरदृष्टीची आहे. त्यांनी घेतलेल्या निर्णयांनी भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्राला नवसंजीवनी दिली. त्यांच्या आठवणींमुळे अनेकांना पुढे जाण्यासाठी प्रेरणा मिळत राहील.