आयुष्य
आयुष्य ते काय
तेच का जीवन
जाती क्षण क्षण
दिवस ते
दैवाचा तो खेळ
कधी हसे सुख
कधी रडणे दुःख
असे वाटे
मनाचा गोंधळ
कधी सत्य वाटे
कधी स्वप्न वाटे
काय करू
द्विधा असे मन
कधी मी अस्तिक
कधी मी नास्तिक
नक्की कोण
कोण मी आहे
आयुष्य सरले
परी न कळले
माझे मला
✦ ✦ ✦
