Wednesday, 22 July 2026 | 9:53 PM
संस्कृती • परंपरा • आधुनिक विचार
22 Jul, 2026 | 9:53 PM
जॉइन शैली

24

साहित्य

आयुष्य

उमा जोशी
उमा जोशी शेवटचे अपडेट: शनिवार, 11 जुलै 2026 | रात्री 12:27
Follow
आयुष्य ते काय 
तेच का जीवन
जाती क्षण क्षण
दिवस ते

दैवाचा तो खेळ
कधी हसे सुख
कधी रडणे दुःख
असे वाटे

मनाचा गोंधळ
कधी सत्य वाटे
कधी स्वप्न वाटे
काय करू

द्विधा असे मन
कधी मी अस्तिक
कधी मी नास्तिक
नक्की कोण

कोण मी आहे
आयुष्य सरले
परी न कळले
माझे मला

✦ ✦ ✦
उमा जोशी

लेखक: उमा जोशी

सौ उमा अमर जोशी साधारण 34 वर्षे योग क्षेत्रात कार्यरत आहे अनेक रुग्णांना सकारात्मक अनुभव आले आहेत.

ट्विटर (X) वर फॉलो करा →

Leave a Comment