Sunday, 7 June 2026 | 2:44 PM
संस्कृती • परंपरा • आधुनिक विचार
7 Jun, 2026 | 2:44 PM
जॉइन शैली

24

संस्कृती

Super Duperr (सुपर डुपर 2026) Movie Review: हलकाफुलका मनोरंजनाचा डोस, पण कथेत दम कमी

लोकेश उमक
लोकेश उमक शेवटचे अपडेट: रविवार, 7 जून 2026 | सकाळी 9:15
Follow
विदुला चौगुले आणि ललित यांच्या भूमिकांनी सजलेला हा मराठी कॉमेडी चित्रपट कसा आहे? वाचा संपूर्ण रिव्ह्यू, रेटिंग आणि क्विक व्हर्डिक्ट.
Super Duperr Movie Review Marathi: हा कॉमेडी चित्रपट पाहावा का?

मराठी सिनेमांमध्ये हलक्याफुलक्या विनोदी चित्रपटांची नेहमीच मागणी असते. सुपर डुपर /Super Duperr हा 2026 मधील असाच एक मनोरंजनप्रधान चित्रपट आहे जो प्रेक्षकांना हसवण्याचा प्रयत्न करतो. चित्रपटात विनोद, कौटुंबिक भावना आणि मैत्री यांचा मिलाफ पाहायला मिळतो. मात्र, चांगल्या कलाकारांची फौज असूनही पटकथेतील कमकुवतपणा जाणवतो.

Super Duperr Movie Review Marathi: हा कॉमेडी चित्रपट पाहावा का?

कथा

चित्रपटाची कथा काही सामान्य तरुणांच्या आयुष्यात अचानक घडणाऱ्या घटनांभोवती फिरते. एक छोटासा निर्णय त्यांच्या आयुष्याला अनपेक्षित वळण देतो आणि त्यातून अनेक मजेशीर प्रसंग घडतात. कथेत कॉमेडीचा भरपूर वापर केला असला तरी काही ठिकाणी कथानक अपेक्षेप्रमाणे पुढे सरकत नाही.

अभिनय

विदुला चौगुले आणि ललित प्रभाकर सिरिअस अँड आपल्या विनोदी टायमिंगने प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. त्यांच्या संवादफेकीत नेहमीप्रमाणेच ऊर्जा दिसते.

मला असा वाटत होता कि चला हवा येऊ द्या हाच शो बघत आहे. नम्रता संबेराव, वनिता खरात, कुशल बद्रिके, यांची भूमिका तुम्हाला हसून पोट दुखायला सोडणार नाही. इतर कलाकारांनीही आपापल्या भूमिकांमध्ये चांगली साथ दिली आहे. निर्मिती सावंत यांनी सिगारेट चा धूर एक नंबर मारला. माझं हसून हसून पोट दुखत होत.

दिग्दर्शन आणि तांत्रिक बाजू

समीर पाटील दिग्दर्शकाने सुपर डुपर चित्रपटाला मनोरंजनात्मक ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. काही दृश्ये प्रभावी आहेत, मात्र पटकथेतील खोलीचा अभाव जाणवतो. सिनेमॅटोग्राफी आणि पार्श्वसंगीत समाधानकारक आहे.

काय आवडलं?

  • निर्मिती सावंत व विदुला चौगुले यांचा अभिनय
  • हलकेफुलके विनोदी प्रसंग
  • कौटुंबिक प्रेक्षकांसाठी योग्य मनोरंजन
  • काही संवाद प्रभावी

काय खटकतं?

  • कथानकात नवीनतेचा अभाव
  • काही प्रसंग अनावश्यकपणे लांबलेले वाटतात
  • भावनिक दृश्यांचा प्रभाव मर्यादित

अंतिम मत

‘Super Duperr’ हा एकदा पाहण्याजोगा मनोरंजनप्रधान मराठी चित्रपट आहे. जर तुम्हाला फारसा विचार न करता हलका-फुलका कॉमेडी सिनेमा पाहायचा असेल तर हा चित्रपट निराश करणार नाही. मात्र, दमदार कथा आणि वेगळा अनुभव शोधणाऱ्या प्रेक्षकांना चित्रपट साधारण वाटू शकतो.

परीक्षण आणि निष्कर्ष (Review Summary)

★★★★☆
754990 मतं (Votes)
4.1/5
सुपर डुपर हा एक मराठी सिनेमा असून एकदा पाहायला हरकत नाही. सिनेमा हा प्रेमाच्या नात्यांवर अवलंबून आहे ज्यात एकाच फ्लॅट मध्ये राहणाऱ्या परक्या लोकांची कशी मैत्री होते व ती कशी जपून ठेवायची कितीही संकट आल तर मग नाही हटायचं हे यात सांगण्यात आल आहे. तुम्ही हा सिनेमा संपूर्ण परिवारासोबत बघू शकता.

✓ काय आवडले (Pros)

  • ओव्हरकटिंग पायहायला दिसून येते.
  • तरीपण हा सिनेमा तुम्ही नक्की बघा ज्यात प्रेमसंबंध कसे टिकून ठेवायचे त्यातल्यात्यात जॉईंट फॅमिली किती महत्वाची असते हे यात दाखवण्यात आल.

✗ काय खटकले (Cons)

  • ग्राफिक्स थोडे कमी पडले जेव्हा फाइट सीन आले तेव्हा.
  • प्लॉट प्रिडेकॅटॅबल होता.
  • शेवट मला नाही आवडला.
✦ ✦ ✦
लोकेश उमक

लेखक: लोकेश उमक

हा एक उत्सुक वाचक आहे आणि त्याला मनोरंजन, आरोग्य, जीवनशैली, संस्कृती, तत्वज्ञान आणि इतर अनेक विषयांमध्ये रस आहे. त्याचे क्युरेट केलेले लेख वाचायला विसरू नका.

ट्विटर (X) वर फॉलो करा →

Leave a Comment